काँग्रेसच्या रायगड जिल्हा महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Uncategorized
उलवे, ता. 18 : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महिला अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या नियुक्त्या नुकत्याच करण्यात आल्या. त्यात उरण तालुका महिला अध्यक्ष म्हणून निर्मला पाटील, रायगड जिल्हा महिला चिटणीस सोनाली पाटील, शांता म्हात्रे, तर रायगड जिल्हा महिला सरचिटणीस म्हणून सविता ठाकूर यांची निवड करण्यात आली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष डाॅ. मनीष पाटील, तसेच रायगड जिल्हा महिला अध्यक्षा रेखाताई घरत यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या नियुक्त्या करून त्यांना पदभार सोपवण्यात आला. यावेळी जयवंत पाटील, वैभव पाटील, किरीट पाटील, संतोष म्हात्रे, मिलिंद पाटील, तुलसा पंडित, पार्वती पाटील, जयश्री पाटील आदी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत यांनी नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *