प्रबुद्ध भूमी फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य

महाड | प्रतिनिधी : महाड तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे प्रबुद्ध भूमी फाउंडेशन च्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याचे आयोजकांनी सांगितले. नांदगाव बुद्रुक येथील महाबोधी बुद्ध विहारात शैक्षणिक साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बौद्ध विकास मंडळाचे खजिनदार व आर. पी आय. […]

Continue Reading

रिपब्लिकन भिमशक्तीचा नवा प्रयोग!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन सेना हा शिवशक्ती आणि भीमशक्तीचा आणखी एक नवा प्रयोग राज्यातील जनतेला पाहायला मिळतो आहे. यापूर्वी पँथर नेते नामदेव ढसाळ यांनी शिवसेनेसोबत हात मिळवला होता. त्यानंतर विद्यमान केंद्रीय […]

Continue Reading

डोंबिवलीची रिझर्व्ह बँक कॉलनी करतेय वृक्षसंपदेचे जतन!

कल्याण | आत्माराम नाटेकर, ज्येष्ठ पत्रकार : डोंबिवलीत जागोजागी मोठमोठ्या इमारती आणि सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवले जात आहेत. यासाठी अडथळे ठरणारी लहानमोठी झाडे तोडली जात आहेत. मुंबई -ठाण्याप्रमाणेच गगनचुंबी इमारतींचे  वारे आता डोंबिवलीतही वाहू लागले आहेत. गगनचुंबी इमारती उभारण्याची विकासकांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. अनेक जुनी झाडे जमीनदोस्त  करून विकासक आपला हेतू साध्य करत आहेत. साहजिकच पर्यावरणाचे संतुलन […]

Continue Reading

खासदार प्रा. वर्षा एकनाथराव गायकवाड यांचा संसदरत्न पुरस्काराने सन्मान. पुरस्काराने जबाबदारी वाढली, मुंबईकरांचे प्रश्न आणखी प्रभावीपणे संसदेत मांडू – खा. वर्षा गायकवाड

मुंबई, दि. २६ जुलै.. संसदेत उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा प्रतिष्ठित असा संसदरत्न पुरस्कार २०२५ हा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व उत्तर मध्य मुंबई मतदार संघाच्या खासदार वर्षा एकनाथराव गायकवाड यांना देऊन सन्मानीत करण्यात आले. नवी दिल्ली येथे एका विशेष कार्यक्रमात संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारानंतर प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा […]

Continue Reading

अंमली पदार्थ विक्रीतील आरोपीस गोव्यातून अटक!

प्रतिनिधी :- विरार : अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या कासीम खान या आरोपीस मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाने गोवा राज्यातून ताब्यात घेतले आहे. मुंबई-अहमदाबाद रोडवरील फाउंटन हॉटेल येथे 17 मे 2025 रोजी सोहल इस्माईल कच्छी ऊर्फ रेती (36), अनिकेत जय वर्मा (27) या मिरा रोड येथे राहणाऱ्या दोन तरुणांना 116.7 ग्रॅम वजनाचा 23,34,000/-रुपये किमतीचा मॅफेड्रॉन हा अंमली […]

Continue Reading

सापे वामने रेल्वे स्थानकाकडे रेल्वे प्रशासन लक्ष देईल का ? प्लॅटफॉर्मवर गवताचे साम्राज्य रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी कच्चा रस्ता

महाड : – निलेश पवार महाड तालुक्यातील वामने गावाजवळ सापे वामने रेल्वे स्थानक सद्या रेल्वे प्रशासनाच्या दुरावस्थेचे बळी पडले आहे. रेल्वे स्थानकावर गवताचे साम्राज्य पसरल्याने प्रवाशांना सर्प दशांची भीती निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी करून देखील रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जात आहे. कोकण रेल्वे मार्गावर महाड पासून सुमारे ११ किमी […]

Continue Reading

गणेशोत्सवात घुमणार लोककलांचा सुर पारंपारिक नृत्य-गायनाची रंगित तालिम सुरू

ठाणे, दि. 11 : महाराष्ट्राला लोककलेची मोठी परंपरा लाभलेली आहे. विशेषत: कोकणात दशावतारी नाटक, शक्तीतुरा, डबलबारी, भजन, किर्तन आणि जाखडी नृत्य लोप पावत चाललेल्या लोककलांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. गावा-गावात लोककलांची रंगित तालिम सुरु झाली आहे. रायगड, रत्नागिरी ते सिंधुदुर्ग घरातघरात गणेशोत्सवानिमित्त चैतन्याचे वातावरण असते. त्यातीलच सुधागड तालुक्यातील चव्हाणवाडी ग्रामस्थ मंडळाने 22 वर्षांनी जाखडी […]

Continue Reading

संजय यादवराव यांना कोकणभूषण पुरस्कार कोकण युवा प्रतिष्ठानचे कोकणरत्न पुरस्कार वितरण उद्या

  ठाणे | प्रतिनिधी :  – कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे संजय यादवराव यांना कोकणभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते प्रदीप कोकरे यांनाही कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संस्थेच्या पुरस्कारांचे वितरण रविवार, २० जुलै रोजी मराठा हितवर्धक मंडळ, डोंबिवली (प.) येथे सायं. ६.०० वा. होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे हे ९ वे […]

Continue Reading

गणेशोत्सव बुकिंगकरता चाकरमान्यांची झुंबड! विरार-मनवेलपाड्यात दूरवर रांगा

    प्रतिनिधी | विरार : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे आरक्षणाची अनुपलब्धता आणि खासगी ट्रव्हल्सकडून ऐन वेळी तिकीट दरांत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेत कोकणवासीयांनी आतापासूनच खासगी गाड्यांची बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. याचे परिणाम म्हणून मागील आठवड्यांपासून विरार-मनवेलपाड्यातील खासगी ट्रॅव्हल्स कार्यालयांसमोर दूरवर रांगा लागलेल्या निदर्शनास येत आहेत. यातील बहुतांश चाकरमानी तिकिटासाठी रात्रीपासूनच रांगेत उभे […]

Continue Reading