महाड शहराला देखील पाणी टंचाईची झळ कोथुर्डे धरणात २० टक्के तर कुर्ला धरणात ३० टक्के पाणीसाठा शिल्लक

0

महाड शहराला देखील पाणी टंचाईची झळ कोथुर्डे धरणात २० टक्के तर कुर्ला धरणात ३० टक्के पाणीसाठा शिल्लक

महाड – प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यात एकीकडे करोडो रुपये खर्चून जलजीवन योजना राबवल्या मात्र तरी देखील पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची झळ जाणवू लागल्याने शहरातील तीन भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती महाड नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

महाड तालुक्यात दरवर्षी ३,००० मिलिमीटर पेक्षाही अधिक पाऊस पडतो. पाणीसाठा करण्यासाठी अनेक योजना देखील राबवल्या आहेत. तरीही शहर आणि तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या कायम आहे. महाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणात अवघा २० टक्के साठा तर कुर्ला धरणात ३० टक्के साठा शिल्लक आहे. शहराला औद्योगिक क्षेत्राकडून कडून रानबाजीरे धरणातून देख्हील पाणीपुरवठा केला जातो. या औद्योगिक महामंडळाकडून महाड शहराला होत असलेला पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. यामुळे महाड शहरात पाणी टंचाईची झळ लागू लागली आहे. यामुळे महाड शहरातील पंचशील नगर, विसावा ते चांभार खिंड, प्रभात कॉलनी ते सावित्री मार्ग या भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात जात असल्याची माहिती महाड नगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी रोहित भोईर यांनी दिली

महाड शहराला दररोज ६५ लाख लिटर पाणीपुरवठा करावा लागतो. या परिस्थितीत चालू वर्षी पाणीपुरवठा करणाऱ्या कोतुर्डे जलाशयामध्ये केवळ २० टक्के साठा शिल्लक आहे तर महाड शहराजवळील कुरले धरणामध्ये केवळ ३० टक्के साठा शिल्लक असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महाड नगर परिषदेमार्फत करण्यात येत आहे तर महाड शहरातला पाणीपुरवठा करणाऱ्या औद्योगिक वसाहतीकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाई जाणवत असल्याचे नगर परिषदेकडून बोलले जात आहे. महाड शहरात सध्या अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे या भागात सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जातआहे.

महाड शहराजवळ नव्याने निर्माण होत असलेल्या कोथेरी धरणाचे घळ भरणीचे काम यावर्षी झाले तर पुढील वर्षीपासून या जलाशयांमधून महाड शहराला पाणीपुरवठा होऊ शकतो त्यामुळे महाड शहरातील पाणीटंचाईची समस्या काही प्रमाणात फुटण्यास मदत होण्याची शक्यता नाकारता येत नाही एकंदरी त महाड शहराला सध्या कोथुर्डे व कुर्ला या दोन धरणावर पाण्यासाठी नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे एमआयडीसी कडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी पाणीपुरवठा नागरिकांना पुरेशा प्रमाणात होत नसल्याने टँकर मार्फत पाणीपुरवठा करण्याची वेळ पुन्हा एकदा महाड नगर परिषदेवर आली आहे

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech