विरार कोमसाप शाखा अध्यक्षपदी अजीव पाटील!

0

विरार | प्रतिनिधी  : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विरार शाखा अध्यक्षपदी अजीव पाटील यांची एकमताने निवड झाली. कोमसापचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे यांच्या उपस्थितीत 2 ऑगस्ट 2025 रोजी निवड प्रक्रिया पार पडली होती. यात अजीव पाटील यांची एकमताने निवड झालेली आहे.

समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय असलेले अजीव पाटील कोकण मराठी साहित्य परिषदेचे मान्यवर सदस्य आहेत. साहित्यविषयक विविध उपक्रमांचे सातत्याने ते आयोजन करत असतात. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातूनदेखील ते कार्यरत आले आहेत.

राजकीय व सामाजिक जीवनात निरंतर कार्यरत असल्याने लोकसंग्रहाची मोठी शिदोरी अजीव पाटील यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे; सागरलाटा या दिवाळी अंकाचे ते संपादक आहेत. त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech