मुंबई| मुंबईतून प्रकाशित होणार्या जनसंवाद प्रकाशनच्या ‘शब्द संवाद’ या दिवाळी अंकाचे यंदा चौथे वर्ष आहे. गेल्या दोन वर्षांत शब्द संवाद दिवाळी अंकाला साहित्यिक तसेच वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. शब्द संवाद दिवाळी अंकाची ओळख सातासमुद्रापार कॅनडा, सौदी अरेबिया, लंडन आदी ठिकाणी असलेले भारतीय तसेच मराठीजनांपर्यंत जावून पोहोचली आहे.
‘शब्द संवाद’ने यंदा पर्यटन हा विषय निवडला असून केवळ पर्यटनावर आधारित लेखांपेक्षा ज्या ठिकाणी पर्यटन केले आहे तेथे झालेला विकास, तेथील पर्यवरण, संस्कृती, औद्योगिक विकास, लोकांचे राहणीमान आणि एखादे वेगळे चरित्र अशा स्वरूपातील लेखांची आवश्यकता आहे. संपर्क ीहरलवीरपुरवसारळश्र.लेा या मेलवर किंवा ९०२८७००४८४, ९८९२७५५८१८ या व्हॉट्अॅप क्रमांकावर पाठवावेत.