मुंबईकरांची प्राणवायू असलेली बेस्ट सेवा पूर्ववत करा, धारावी नागरिक समितीची बेस्ट महाव्यवस्थापकाकडे मागणी!
मुंबई :(दत्ता खंदारे ) ७ऑगस्ट बेस्ट दिन फक्त नावाला शिल्लक राहिला आहे.नफ्यात व लोकप्रवाशांना उपयुक्त ठरणारी तसेच मुंबईकराची प्राणवायू असलेली बेस्ट सेवा पूर्वीप्रमाणे शंभर टक्के सुरू करा असे आशयाचे एक निवेदन धारावी नागरिक समितीचे संघटक सचिव दिलीप गाडेकर यांनी दि.६ऑगस्ट २०२५ रोजी एका निवेदनाद्वारे बेस्ट महाव्यवस्थापकांना लेखी मागणी करून कळविले आहे.
पूर्वी साधारण ४००० च्या जवळपास बेस्ट बस वाहने होती. त्या बेस्ट सेवेचा लाभ मुंबईतील कामगार वर्ग घेत होता. कालांतराने हळूहळू बेस्ट उपक्रमाच्या गाड्या बंद करून बेस्ट तोट्यात दाखवू लागली. नियमित व प्रवासाच्या प्रसंगी उतरलेली बेस्ट सेवा अचानकपणे तोट्यात जाऊ लागली. बेस्ट कामगार कर्मचारी कुटुंबीय तसेच बेस्ट आगार व बेस्ट गाड्या निकालात निघू लागल्या.त्यामुळे मुंबईकरांच्या सेवेवर परिणाम झाला. त्यात अधिक भर टाकून खाजगी कंपन्यांनी ठेकेदारांनी घुसखोरी करून बेस्टच्या नावाखाली खाजगीकरण सुरू झाले.
हळूहळू प्रवासी संख्या कमी झाली.आता तर काय प्रवासी तिकिटाचे भाव दुप्पट केले तरीही जनता शांत आहे. यासह बेस्ट विद्युत विभागामार्फत घरोघरी लाईट बिल यायचे तेही आता मोबाईलवर येऊ लागले. त्यामुळे सर्वसाधारण जनतेला वेळेत बिल भरण्याची सवय मोडून गेली. कारण विद्युत बिल उशिरा येऊ लागले.
त्यामुळे शंभर टक्के फायदा मध्ये चालणारी बेस्ट सेवा आता खड्ड्यात जात आहे का अशी चिंता व मुंबईकरांना वाटू लागली.बेस्ट तोट्यात आणि खाजगी ठेकेदार फायद्यात अशी व्यवस्था निर्माण झाली आहे. बेस्ट ने पुनर्विचार करून पूर्वीसारखी शंभर टक्के सर्व रूट वरील बस सेवा सुरू केल्यास आणि खाजगीकरणाला विरोध केल्यास तसेच कामगार टिकविल्यास बेस्ट ला सोन्याचे दिवस यायला उशीर लागणार नाही.
तरी या मागणीचा बेस्ट प्रशासनाने, कामगार युनियन नेत्याने विचार करावा.यामध्ये महापालिका प्रशासन, महाराष्ट्र शासन व बेस्ट यांनी एकत्र मध्यम मार्ग काढून आर्थिक बाजू सावरावी.अन्यथा मुंबईकर आपणास माफ करणार नाही असा इशाराही संघटक सचिव श्री दिलीप गाडेकर यांनी बेस्ट प्रशासनाला दिला आहे.