कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ( महाराष्ट्र ) या व्यावसायिक संस्थेने आयोजित

0

कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ( महाराष्ट्र ) या व्यावसायिक संस्थेने आयोजि व्यावसायिक प्रदर्शन आणि विक्री २०२५ या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद !!!

विरार | प्रतिनिधी :–  कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ( महाराष्ट्र ) या समाजाच्या बहुउद्देशीय व्यावसायिक संस्थेने रविवार दिनांक ०३ ऑगस्ट , २०२५ रोजी एक गणेशोत्सवा निमित सेंट अँथनी हायस्कूल , नगीनदास पाडा , नालासोपारा ( पूर्व ) येथे एक दिवसाचे व्यावसायिकांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री २०२५ चे भव्य आयोजन केले होते . सदर प्रदर्शनात संपूर्ण पटांगण व्यावसायिकाने व्यापलेले होते . या प्रदर्शनात एकूण ८१ व्यवसायिकांनी सहभाग नोंदवून संस्थेच्या प्रयोजनाला मोठा प्रतिसाद दिला . या प्रदर्शनात व्यवसायिकांनी गणेशोत्सवासाठी लागणारे पूजेचे दर्जेदार साहित्य , विद्युत रोषणाई , दर्जेदार अनेक प्रकारच्या अगरबत्ती , मखर , विविध प्रकारचे डिजिटल पडदे , बाप्पासाठी विविध फेटे , गणेशाचे विविध आभूषणे , इमिटेशन दागिने तसेच घरगुती मसाले , कोकण मेवा , विविध दर्जेदार लहान मुलांचे , महिलांचे कपडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला डोळे तपासणीचे केंद्र आणि बरेचकाही वाजवी भावात विक्रीसाठी उपलब्ध केले होते .या भव्यदिव्य प्रदर्शनाला परिसरातील गणेशभक्त ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला .

या प्रदर्शन आणि विक्री २०२५ महोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून अशोकजी वालम ( पक्षप्रमुख – बळीराज सेना आणि संस्थेचे संस्थापक ) म्हणून उपस्थिती लाभली. तसेच या विक्री आणि प्रदर्शनाचे उद्घघाटन त्यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आले. तसेच वसई विरार शहर महानगर पालिकेचे प्रथम महापौर ( प्रथम नागरिक ) तथा कामगार नेते सन्माननीय श्री . राजीवजी यशवंत पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन आपले अमूल्य मार्गदर्शन व्यावसायिकांना केले . ते स्वतः पालघर जिल्हा OBC आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असल्याने संस्थेला प्रगतीसाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्याने आपल्या प्रेरणादायी भाषणात संस्था आणि व्यावसायिकांना दिले . त्यांच्या उपस्थितीने व्यवसायांचे मनोबल उंचावले आहे .

तसेच या कार्यक्रमात बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव , नगरसेवक , कोकण मराठी साहित्य परिषद विरारचे अध्यक्ष अजिवजी पाटील साहेब , किशोरजी पाटील , संगीता भेरे , पंकजजी देशमुख , प्रकाशजी नाडकर , डॉ . श्री .संजयजी जाधव , प्रकाशजी भोईर , रामचंद्रजी मंडलिक आणि महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजचे उपसंपादक दीपकजी मांडवकर यांनी आपली उपस्थिती या प्रदर्शनात दर्शवून अमूल मार्गदर्शन व्यावसायिकांना दिले . तसेच भविष्यात संस्थेच्या कामाला योगदान देण्याचे आश्वासन दिले . तसेच संस्थेने या सर्व प्रतिष्ठित मान्यवर अतिथींचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला .

या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या अध्यक्ष प्रेमनाथ ठोंबरे , सचिव ऍड . अजय पाटील , खजिनदार हर्षलीताई धाडवे , उपाध्यक्ष प्रकाश भोस्तेकर , सहउपाध्यक्ष दयानंद चिंचवलकर , सह सचिव ऍड . विनेश वालम , सह सचिव महेश पारदुले , सह खजिनदार ऍड . अवधूत तिरस्कर , सदस्य रघुनाथ कळभाटे , श्रीधर कदम , पंकज पालकर , अनंत फिलसे , चंद्रकांत बाईत आणि महेश गोठल या सर्वांनी केले .

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech