अर्नाळा किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी वाचवले आठ जणांचे प्राण!माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला जीवरक्षकांचा सत्कार

0

अर्नाळा किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी वाचवले आठ जणांचे प्राण!माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला जीवरक्षकांचा सत्कार

विरार | प्रतिनिधी : पावसाळा म्हटले हि तरुणाईची एन्जॉय करण्याची मज्जा .कोणी लांब फिरायला जातात तर कोणी जवळपासचे धबधबे शोधतात .पडत्या पावसात समुद्रावर एक वेगळीच मजा येते. अशी मजा करण्यासाठी दोन दिवसापूर्वी मुंबई,कल्याण , ठाणे येथून तरुणांचा मोठा ग्रुप अर्नाळा किनाऱ्यावर आला होता. त्यातील काही जणांना किनाऱ्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ते त्या खड्डयांत ओढले गेले होते. त्यांना वसई विरार महानगरपालिकेच्या जीवरक्षकांनी सुरक्षित बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले आहेत . त्याबद्दल आज नालासोपाराचे माजी आमदार आणि खेळों मास्टर्स गेम्स चे प्रदेश अध्यक्ष क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते जीवरक्षकांचा सत्कार करण्यात आला.

नेहमी प्रमाणे रविवारी अर्नाळा किनार्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. सळसळती तरुणाई समुदारच्या पाण्यात मजा करीत होती. या जमावाला समुद्रात जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न महानगरपालिकेचे ६ जीवरक्षक करत होते. परंतु जवळपास ३०० ते ४०० लोकांचा जमाव असल्याने त्यांना ते कंट्रोल करू शकत नव्हते. त्यातच भरती मुले आणि पावसामुळे किनाऱ्यावर पडलेले मोठे खड्डे दिसण्यात येत नव्हते. यातच खड्ड्याच्या जवळ गेलेल्या पैकी आठ जण खड्यात ओढले गेले होते.

भरती असल्याने समुद्राच्या पाण्याचा प्रवाह त्यांना आत खेचत असताना समयसूचकता दाखवत जीवरक्षकांनी जीवाची बाजी लावून आठही पर्यटकांचा जीव वाचविण्यात यश मिळविले.पर्यटकांना वाचविण्याचे मध्ये अक्षय मेहेर,अविष्कार वैती,यज्ञेश म्हात्रे,समीर पागधरे,बबन गवारी,आणि अनिल निजाई यांचा समावेश होता.

या कामाची दखल घेत आज नालासोपाराच माजी आमदार तसेच खेळों मास्टर्स गेम्स चे प्रदेशध्यक्ष क्षितिज ठाकूर यांनी त्यांचा सत्कार केला. या सत्कार वेळी खेळों मास्टर्स गेम्स कंगे पालघर जिल्हा साची अमन चौधरी,सुनील म्हामुणकर ,चंद्रकांत चाळके,व हेमांगी सावे हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना क्षितिज ठाकूर यांनी जीवरक्षकांचे कौतुक करून सांगितले कि,तुम्ही नुसते आठ जीव वाचविले नाहीत तर आठ परिवार वाचविले आहेत. वाचविलेल्या मध्ये तरुण कमावत्या आणि कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणांचा त्यात समावेश होता. यापुढे हि आपण असेच सज्ज राहून किनाऱ्यावरील पर्यटकांना आधार द्याल अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech