पुण्यातील ८०० गरजू विद्यार्थ्यांना कोकण संस्थेचे शैक्षणिक पाठबळ
पुणे | : कै. गेनबा सोपान मोझे माध्य. विद्यालय शाळा, येरवडा, पुणे येथे कोकण कला व शिक्षण विकास संस्था व सिंक्रो डिजिटल – ए डीलर ऑन कंपनी यांच्या अंतर्गत ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक वर्षाची सुरुवात सुलभ व्हावी व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री सहज उपलब्ध व्हावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या शालेय साहित्यामध्ये वह्या, पुस्तके, कंपास पेटी अन्य उपयोगी साहित्य यांचा समावेश होता. अनेक वेळा आर्थिक अडचणीमुळे अनेक मुलांना आवश्यक शालेय साहित्य मिळत नाही, त्यामुळे त्यांचा अभ्यासात रस कमी होतो. हे लक्षात घेऊन कोकण संस्था दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वितरित करून त्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य करते. कोकण संस्था’ शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधांद्वारे वंचितांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत आहे. सध्या ही संस्था महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये काम करत असून सुमारे ५०,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे.
या उपक्रमात सिंक्रो डिजिटल – ए डीलर ऑन कंपनी चे व्हाईस ऑन प्रेसिडेंट, इंडिया ऑपरेशन्स – रवी मोतवानी, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ कॉर्पोरेट इंटिग्रेशन – अॅलेक्स पापाडोपुलोस, डायरेक्टर ऑफ डिजिटल ऍडव्हर्टायजिंग ऑपरेशन्स – ऍशली विकलुंड, डायरेक्टर ऑफ सीईओ – जाकोब लासकसक, टीम मॅनेजर, सीईओ – कार्लो लोपेझ, डायरेक्टर सीईओ अँड एसईएम – साकेत सिन्हा , टीम मॅनेजर, सीईओ – संगीता किझहककारा, पीपल मॅनेजर – गार्गी रत्ना, फॅसिलीटीस अँड ऍडमिन मॅनेजर – नम्रता अग्रेसर या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते.
त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांचाहि सक्रिय सहभाग लाभला. कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल म्हणतात, “महाराष्ट्रातील वंचित मुलांना शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत सुविधा देऊन त्यांना सक्षम बनवणं हे आमचं ध्येय आहे. आम्ही केवळ साहित्य देत नाही, तर आत्मविश्वास आणि मोठी स्वप्न बघण्याचा दृष्टिकोन देतो. त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी कोकण संस्था सातत्याने कार्यरत आहे.”
या उपक्रमांतर्गत शाळेचे प्रतिनिधी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. कोकण संस्थेच्या वतीने हेड प्रोजेक्ट डिपार्टमेंट – प्रीती पांगे, असिस्टन्ट प्रोजेक्ट मॅनेजर – संतोष धोके, असिस्टन्ट प्रोजेक्ट कोऑर्डिनटर – निकिता कंटाळे , टीम लीडर – वैशाली चौधरी, ऑफिस एक्झिक्युटिव्ह – प्रशांत धनगर सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव आणि भावना व्यक्त केल्या. त्यामधील काही विद्यार्थ्यांनी सांगितले, “या शालेय किटमुळे आमच्या अभ्यासात खूप मदत होईल. मिळालेल्या या साहित्यामुळे आम्ही नवीन शैक्षणिक वर्षासाठी खूप उत्सुक आहोत.
कोकण संस्था ग्रामीण भागात शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, संधी आणि स्वप्नांची दिशा मिळते. कोणताही विद्यार्थी शैक्षणिक साहित्यावाचून किंवा शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी हे उपक्रम सातत्याने राबवले जातील, असे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष श्री. दयानंद कुबल यांनी यावेळी दिले.