महाड | प्रतिनिधी : महाड तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे प्रबुद्ध भूमी फाउंडेशन च्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याचे आयोजकांनी सांगितले.
नांदगाव बुद्रुक येथील महाबोधी बुद्ध विहारात शैक्षणिक साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बौद्ध विकास मंडळाचे खजिनदार व आर. पी आय. बांद्रा तालुका अध्यक्ष प्रमोद चायाजी जाधव, सत्यवान राऊळ, सरपंच अलका ताई चिले, पोलिस पाटील गिरीश गायकर, सुशांत चिले यांच्यासह ज्येष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रमोद जयाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हे शैक्षणिक साहित्य एक प्रोत्साहन देण्याकरता असून तुम्ही तुमच्या जिद्दीच्या बळावर यश संपादन करत जा असा मोलाचा सल्ला दिला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक भावकीचे पदाधिकारी व महिला, तरुण तरुणी मंडळ तथा विद्यार्थी यांनी अथक मेहनत घेतली. यावेळी प्रमोद चायाजी जाधव यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.