मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करा अन्यथा चक्काजाम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इशारा

0

मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करा अन्यथा चक्काजाम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इशारा

महाड – प्रतिनिधी :- मुंबई गोवा महामार्ग आज देखील सुखकर प्रवासा साठी योग्य नसल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या या कामाचा त्रास सर्वसामान्य जनतेला बसत असून येत्या गणेशोत्सवापूर्वी मार्ग वाहतुकीस सुखकर न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चक्का जाम केला जाईल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम गेले अनेक वर्षापासून रडत खडत सुरू आहे. आज देखील नागोठणे वडखळ लोणेरे या ठिकाणी तसेच पुढे चिपळूण दरम्यान रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे.

झालेला काँक्रीट मार्ग देखील उंच सखल आणि खाज खळग्यांचा झाला असल्याने रस्त्यावरून वाहने चालवताना वाहनांचे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे वाहनांचे टायर देखील गरम होतात अशा प्रकारच्या तक्रारी वाहन चालकांकडून येत आहेत. नागोठणे, लोणेरे, कोलाड या ठिकाणी देण्यात आलेल्या पर्यायी मार्गावर देखील खड्डेच खड्डे पडले आहेत. तसेच पुलांची कामे देखील अपूर्ण आहेत.

या सर्व कामांचा आणि निकृष्ट दर्जाच्या महामार्गाचा त्रास गणेशोत्सवात येणाऱ्या चाकरमान्यांना बसतो. गेली अनेक वर्ष हा त्रास सहन करणाऱ्या चाकरमान्यांना आता तरी सुखकर प्रवासाची संधी मिळेल अशी आशा होती मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा त्रास काही केल्या कमी झालेला नाही. यामुळे महाड मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महान प्रांताधिकारी यांना निवेदन सादर केले.

या निवेदनानुसार येत्या 15 ऑगस्ट पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण करावे तसेच तातडीने खड्डे भरले जावे, अपूर्ण रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करावे, सुरक्षा उपायोजना करण्यात याव्यात, दोशी ठेकेदारांवर कारवाई केली जावी अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आले आहेत. यावेळी वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष मोरे, तालुकाप्रमुख आशिष पळसकर, दक्षिण रायगड युवा सेना अध्यक्ष बंटी पोटफोडे, शहर प्रमुख मंगेश देवरुखकर, युवा सेना अधिकारी प्रफुल्ल धोंडगे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech