अंमली पदार्थ विक्रीतील आरोपीस गोव्यातून अटक!

0

प्रतिनिधी :- विरार : अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या कासीम खान या आरोपीस मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाने गोवा राज्यातून ताब्यात घेतले आहे.

मुंबई-अहमदाबाद रोडवरील फाउंटन हॉटेल येथे 17 मे 2025 रोजी सोहल इस्माईल कच्छी ऊर्फ रेती (36), अनिकेत जय वर्मा (27) या मिरा रोड येथे राहणाऱ्या दोन तरुणांना 116.7 ग्रॅम वजनाचा 23,34,000/-रुपये किमतीचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्री करता जवळ बाळगला असता मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक 226/2025 एनडीपीएस ॲक्ट कलम8(क),22(क), 29 प्रमाणे 18. मे 2025 रोजी गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासांअती अमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखा, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय करीत होते.

आरोपींच्या तपासात मिरा रोड येथे राहणाऱ्या अरबाज ऊर्फ कासीम निसार खान याने हा अंमली पदार्थ विक्रीसाठी पुरविल्याचे अमली पदार्थविरोधी पथकाने निष्पन्न केले होते. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून अस्तित्व लपवून पोलिसांच्या नजरेआड झालेला होता.

दरम्यान; पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करून अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले होते. सदर गुन्ह्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाकडून तपास करत असताना गुप्त बातमीदार व तांत्रीक विश्लेषणावरून आरोपी गोवा राज्यात लपून बसला असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे 21 जुलै रोजी तात्काळ गोवा येथे पोलीस पथक रवाना करून नॉर्थ गोवा येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात मिरा रोड पोलीस ठाणे एनडीपीएस ॲक्ट कलम 8(क), 22(क), 29 व काशिमिरा पोलीस ठाणे एनडीपीएस ॲक्ट कलम 8(क),22(क), 29 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
***

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech