ठाणे | प्रतिनिधी : – कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे संजय यादवराव यांना कोकणभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते प्रदीप कोकरे यांनाही कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संस्थेच्या पुरस्कारांचे वितरण रविवार, २० जुलै रोजी मराठा हितवर्धक मंडळ, डोंबिवली (प.) येथे सायं. ६.०० वा. होणार आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे हे ९ वे वर्ष आहे. राजेश देशपांडे (कला), दिनेश लाड (क्रीडा), ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र शिर्के (पत्रकारिता), अजय आयरे (उद्योग), संदीप परटवलकर (शिक्षण), मनिष शिंदे (शौर्य), प्रदीप कोकरे (साहित्य), अमर खामकर (कृषी), श्रीमती श्रध्दा कळंबटे (सामाजिक) आदींना कोकणरत्न पुरस्काराने या वेळी सन्मानित करण्यात येईल.
संगीत भजन स्पर्धेचे आयोजन
संस्थेतर्फे शनिवार आणि रविवारी मराठा हितवर्धक मंडळाच्या सभागृहात संगीत भजन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सचिव विराज चव्हाण यांनी दिली.