गणेशोत्सवात घुमणार लोककलांचा सुर पारंपारिक नृत्य-गायनाची रंगित तालिम सुरू

0

ठाणे, दि. 11 : महाराष्ट्राला लोककलेची मोठी परंपरा लाभलेली आहे. विशेषत: कोकणात दशावतारी नाटक, शक्तीतुरा, डबलबारी, भजन, किर्तन आणि जाखडी नृत्य लोप पावत चाललेल्या लोककलांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. गावा-गावात लोककलांची रंगित तालिम सुरु झाली आहे. रायगड, रत्नागिरी ते सिंधुदुर्ग घरातघरात गणेशोत्सवानिमित्त चैतन्याचे वातावरण असते. त्यातीलच सुधागड तालुक्यातील चव्हाणवाडी ग्रामस्थ मंडळाने 22 वर्षांनी जाखडी नृत्याची जमवाजमव सुरू केली आहे. पारंपरिक जाखडी नृत्य बाळकूम येथील मरू आईच्या मंदिरात शुभारंभ करण्यात आला.

आता दर शनिवार-रविवार या मंडळाची रंगित तालिम येथे सुरू असते. विशेष म्हणजे गावच्या तरुण मंडळींचा या नृत्यात मोठा सहभाग असतो. तर ठाणे आणि भिवंडीमध्ये पुंडलिकबुवा मोरे यांच्या माध्यमातून नवीन होतकरू कलाकार मंडळींना तेजस मोरे आणि सौजस मोरे हे लोकसंगिताचे धडे देत आहेत.
आषाढी वारी करून आले की शेतीची कामं सुरू झाली की भात लावणी करत असताना गावची कलाकार मंडळी फावल्या वेळात जाखडी नृत्य, शक्ती तुरा, भजन कीर्तन यात दंग होतात. खरंतर लोककला जपणे आणि आपली संस्कृती टिकवणे यासाठी ही मंडळी अहोरात्र मेहनत घेतात. श्रावणात महिलांचे मंगळगौरी खेळ, भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव आणि नवरात्री उत्सव यामध्ये कोकण पट्टÎा मध्ये या लोककला प्रत्येक गावात सादर होत असतात.

मात्र सध्या नोकरीनिमित्त शहराकडे आलेला चाकरमानी या कलेपासून दूरावला आहे. म्हणूनच श्री दत्त गुरु नाच मंडळ चव्हाणवाडी सुधागड रायगड यांचा जाखडी नाच 22 वर्ष बंद होता. नवतरूण मुलांनी तो परत चालू केला ही कोकणातील लोककला जिवंत ठेवण्यासाठी हा मंडळ तत्पर आहे विषेश म्हणजे त्याच्यात मुलींचा सुद्धा सहभाग आहे. सुधागड तालुक्यातील हे ठाण्यात राहणारे चाकरमानी एकत्र येवून याचा सराव करत आसतात जसा पावसाळा चालू झाला की शेतकरी राजा शेतात नांगर धरून गाणी गुणगुणत आसतो आणि गुरे चारणारा गुराखी एखाद्या रानमाळावर आपले सवंगडी जमा करून गोळ रिंगण करून नाचू लागतात.

जशी आषाढी वारी जवळ आली की वारकर्यांना पंढरपूरची ओढ लागते तसे गणपती जवळ आले की ह्या कलावंताना जाखडीची चाहुल लागते. गुरुपोर्णीमेचे औचित्य साधुन त्यांनी श्रीफळ वाढवून सरावाला सुरवात केली. आदीमाया शक्ती म्हणजे शक्तीवाले की जय शंकर बुवा की जय ढोलकीवर थाप टाकुन कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी लोककलावंत पुंडलिक बुवा मोरे हे सुद्धा उपस्थित होते.

जाखडी नृत्य, कलगीतुरा, शक्तीतुरा याच्यासोबत गावागावात देवाचं जागरण करण्यासाठी अनेक मंडळांमध्ये भक्तीसंगिताचा सुर आळवला जातो. भजन, कीर्तन, प्रवचन आणि लोकसंगिताच्या कार्यक्रमांची मेजवानीही असते. ठाण्यातील श्री बल्लाळेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या माध्यमातून पुंडलिकबुवा मोरे आणि त्यांची दोन मुलं सुप्रसिद्ध ढोलकीपटु तेजस मोरे आणि बालशाहीर सौजस मोरे हे लोककलेच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं नियोजन करीत आहेत. त्यांच्या कार्यक्रमांना ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ते संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर येथेही कार्यक्रमांसाठी निमंत्रित केले जाते.

तेजसची सुरेल ढोलकीची थाप आणि सौजसचा मधुर आवाज छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा, शाहीर अण्णाभाउ साठेंच्या `माझी मैना गावाकडं राहिली’ ते गण-गौळण, भारुड अशा विविध कार्यक्रमांतून समाजप्रबोधन आणि लोककलेचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रभर पोहोचविण्याचे कार्य केले जात आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech