“सायकलवरून आला प्रकाश — बेघरांच्या चेहऱ्यावर झळकली खरी दिवाळी”
ठाणे : दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि माणुसकीचा उत्सव — आणि ठाण्यातील सायकल प्रेमी फाउंडेशन (ACPF) ने यंदा तो अर्थ अधिक सुंदरपणे उजळवला.
संस्थेने “इको-फ्रेंडली दिवाळी सायकल राईड” आयोजित करून ठाणे महानगरपालिकेच्या बेघर निवारा केंद्रातील लाभार्थ्यांसोबत फराळ, मिठाई आणि संवादाच्या माध्यमातून दिवाळी साजरी केली.
या वेळी सायकलिस्ट प्रिया कांबळे हिने सायकलवर आधारित रांगोळी साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निवारा केंद्रातील रहिवाशांनी आलेल्या सायकल प्रेमींची ओवाळणी करून स्वागत केले.भावनांनी भरलेल्या क्षणांत एक लाभार्थी म्हणाला, “मन भरून आलं… इतक्या वर्षांनी असं वाटलं की कोणीतरी आपल्यासाठी आलं आहे. ही दिवाळी आमच्यासाठी खरंच खास ठरली.” केंद्राचे व्यवस्थापक मनीष वाघमारे म्हणाले, > “या केंद्रातील अनेकजण जीवनातील संघर्षांमुळे समाजापासून दूर गेलेले आहेत.अशा कार्यक्रमांमुळे त्यांना आत्मविश्वास आणि माणुसकीचा हात मिळतो.”
या वेळी “दुर्गे दुर्घट भारी – नवरात्र सायकल चॅलेंज 2025” चा निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षक तुषार डोके यांचा सत्कार करण्यात आला, तर संस्थेतील रणरागिणी प्रिया कांबळे हिला “नवदुर्गा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष प्रज्ञा मात्रे म्हणाल्या की, “या केंद्रातील अनेक लाभार्थी जीवनातील संघर्षांमुळे समाजापासून दुरावलेले आहेत.
अशा कार्यक्रमांमुळे त्यांना आत्मविश्वास आणि माणुसकीचा हात मिळतो.”
🏆 निकाल संक्षेप:
हौशी गट (Men): ऋषिराज टिल्लू, प्रकाश जिझस, प्रदीपकुमार सोलंकर
हौशी गट (Women): शीतल देवळकर, लता रविचंदर, प्रिया कांबळे
प्रोफेशनल गट (Men): रवी यादव, प्रशांत कावळे, प्रविण सागरे
प्रोफेशनल गट (Women): वैशाली पवार, जयश्री कुदळे, डॉ. वैशाली दोंडे
सायकलिस्ट सतीश जाधव म्हणाले > “दरवाजातून आत येताना ओवाळणी झाली, तेव्हा आईची आठवण झाली.
सामाजिक समरसतेची जाणीव मनात ठेवणं — हीच खरी दिवाळी आहे.”
सुवर्णा अडसुळे, दुर्गा गोरे, नरेश मालुसकर, कुंदा शिरसाट यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाला अर्थपूर्ण बनवणारी ठरली.