महाड | निलेश पवार : – महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या प्रवेशद्वारा वर असलेले जुने आंब्याचे झाड आज धो धो पडणाऱ्या पावसामध्ये कोसळले. या आंब्याच्या झाडावर शेकडो बगळ्यांनी घरटी बांधली होती. झाड कोसळल्यानंतर हे पक्षी देखील जमिनीवर कोसळले यामध्ये अनेक पक्षी बेघर झाले तर अनेक पक्षी जखमी झाले या जखमी पक्षांकडे पाहून येणाऱ्या जाणारी मानवी मनं मात्र हेलावले.
ऐतिहासिक चवदार तळ्याच्या काठावर एक जुन्या आंब्याचे झाड होते. या आंब्याच्या झाडावर शेकडो पक्षांनी आपली घरटी केली होती. सायंकाळच्या सुमारास हे पक्षी या ठिकाणी विसाव्याला येत होते. यामध्ये प्रामुख्याने बगळ्यांचा समावेश होता. या बगळ्यांनी या ठिकाणी या आंब्याच्या झाडाला घरच केले होते. आज पडणाऱ्या पावसामध्ये हे आंब्याचे झाड देखील कोसळले. या कोसळणाऱ्या झाडाबरोबर पक्षांची घरटी, लहान पिले, आणि बगळे देखील जमिनीवर आदळले. जमिनीवर आढळलेल्या पक्षांच्या घरट्यांचे नुकसान झालेच मात्र त्याचबरोबर अनेक पक्षी जखमी देखील झाले.
आज गोकुळाष्टमी असल्याने एकीकडे आनंदाचा उत्सव साजरा होत होता तर दुसरीकडे या पक्षांच्या जीवनामध्ये बेघर झाल्याचे दुःख निर्माण झाले. 14 तळ्याच्या शेजारून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची मने देखील हे दृश्य पाहून चांगलेच हेलावले. अनेकांनी या जखमी पक्षांना झाडांच्या फांद्यांमधून बाजूला करून ठेवले. मात्र जोपर्यंत उपचार मिळत नाहीत तोपर्यंत पक्षांची तडफड सुरूच राहिली. या तडफडणाऱ्या पक्षांकडे पाहून अनेकांची मने दुखीत झाली.