अधिकाऱ्यांनी मढ्यावरचं लोणी खाल्लं! 20 कोटींच्या खर्चा नंतरही. महापालिका स्मशानभूमींत लाकडांचा तुटवडा..! स्मशानभूमींचीही दुर्दशा : नागरिकांच्या संतापाचा कडेलोट!

0

■ अधिकाऱ्यांनी मढ्यावरचं लोणी खाल्लं! 20 कोटींच्या खर्चानंतरही….महापालिका स्मशानभूमींत लाकडांचा तुटवडा…! स्मशानभूमींचीही दुर्दशा : नागरिकांच्या संतापाचा कडेलोट!

विरार | प्रतिनिधी : मागील पाच वर्षांत जळाऊ लाकडे व अन्य सुविधांवर अंदाजित 20 कोटी रुपये खर्च करूनही वसई-विरार महापालिकेच्या बहुतांश स्मशानभूमींत लाकडेच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचे परिणाम म्हणून स्मशानभूमींत अंत्यसंस्कारांसाठी आणल्या जाणाऱ्या मृतदेहांची फरफट होत असून; मृतांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विरार पूर्व-फुलपाडा भागातील रहिवासी रणजीत सदा यांच्या आजोबांचे दीर्घ आजाराने रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी फुलपाडा येथील स्मशानभूमीत आणला होता. परंतु या स्मशानभूमीत लाकडेच उपलब्ध नसल्याची माहिती त्यांना देण्यात आली. सुमारे 60 लाख रुपयांचे बिल थकले असल्याने गेल्या 15 दिवसांपासून लाकडांचा पुरवठा ठेकेदाराने पूर्णपणे बंद केला असल्याचे स्मशानभूमीतील कर्मचारी संजय सुर्वे यांनी त्यांना सांगितले. त्यामुळे सदा कुटुंबीयांना मृतदेहासाठी पर्यायी स्मशानभूमी गाठावी लागली.

केवळ फुलपाडाच नाही; तर मनवेलपाडा, चंदनसार, कोपरी गावांतील स्मशानभूमींतही हीच स्थिती आहे. तिथेही लाकडे उपलब्ध नसल्याने लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच संजय केळकर त्यांच्या टेम्पोतून लाकडे नेण्यासाठी या ठिकाणी आले होते; परंतु त्यांचीही निराशा झाली होती. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार; ही अतिशय चिंताजनक स्थिती आहे. अंत्यसंस्कारांसारख्या संवेदनशील प्रक्रियेत मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना सदस्यांना वारंवार भटकंती करावी लागत आहे. स्मशानभूमींत आवश्यक मूलभूत सुविधा योग्यरीत्या पुरवली जात नसल्याने महापालिकेच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

गंभीर बाब म्हणजे; स्मशानभूमींची अवस्थाही खूपच वाईट आहे. कार्यालयांत पंखाही नाही, भिंतींमधून पावसाचे पाणी गळते आणि सर्वत्र गोंधळ उडतो. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, तीनपेक्षा जास्त वेळा पालिका अधिकाऱ्यांना पत्रे पाठवण्यात आली आहेत, परंतु अद्याप समस्या सुटलेली नाही. यामुळे अंत्यसंस्कारांसाठी दररोज येणाऱ्या नागरिकांना योग्य ती सेवाही देता येत नाही.

दरम्यान; सन 2024-25 या वर्षात महानगरपालिका हद्दीतील स्मशानभूमींत शव दहनासाठी जळाऊ लाकडांचा पुरवठा करण्याकरता वसई-विरार महापालिकेने 2 कोटी 40 लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय या माध्यमातून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी विरार-विराट नगर येथील स्मशानभूमीत दीड कोटी रुपये खर्च करून वायुउत्सर्जन चिमणी बसविण्यात आलेली आहे. मागील पाच वर्षांत पालिकेने जळाऊ लाकडांवर अंदाजे 10 कोटी रुपये खर्च केलेले आहेत.

वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीत एकूण 88 स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमींत प्रेत दहनाकरता जळाऊ लाकडे महापालिकेमार्फत मोफत पुरवण्यात येतात. मार्च 2023 पर्यंत प्रेतदहनाकरता 3109 टन 695 किलोग्रॅम जळाऊ लाकडांचा वापर झालेला आहे. एप्रिल 2022 ते मार्च 2023 अखेरपर्यंत एकूण 8801 शव दहन करण्यात आली असल्याचे पालिकेने म्हटले आहे. तर मार्च 2024 पर्यंत 4083 टन 575 किलो जळाऊ लाकडांचा पुरवठा झालेला आहे. या माध्यमातून एप्रिल 2023 ते मार्च 2024 अखेरपर्यंत एकूण 8742 शव दहन करण्यात आलेली आहेत. सन 2019 ते 2024 पर्यंत वसई-विरार महापालिकेने 8 कोटी 67 लाख 87 हजार 683 इतका खर्च केवळ जळाऊ लाकडांवर केलेला आहे.

दरम्यान; कोविड संक्रमण काळात वाढलेली मृत्यूंची संख्या; शिवाय मृतदेह जाळताना होणारे प्रदूषण रोखणे, वृक्षांचे संवर्धन व संरक्षण होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमां`तर्गत पालिकेने शहरातील स्मशानभूमींत गॅसशवदाहिनी बसवण्याचा निर्णय घेतला होता.

या कार्यक्रमांतर्गत पालिकेला प्राप्त झालेल्या 32 कोटीच्या निधीतून आचाळेसह पाचूबंदर, नवघर, समेळपाडा आणि विरार स्मशानभूमींत गॅसशवदाहिनी बसवण्यात आलेली होती. त्यासाठी प्रति गॅस शवदाहिनी 32,97,510 इतकी रक्कम निश्चित करण्यात आली होती. चार स्मशानभूमींतील गॅस शवदाहिनीकरता पालिकेने तब्बल 1 कोटी 31 लाख 90 हजार 040 रुपये खर्च केलेले आहेत.

दरम्यान; वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील विविध स्मशानभूमींत ‘कास्ट आयर्न`च्या शवदाहिनी खरेदी करण्याचा निर्णयदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेला आहे. 2025-26, 2026-27 आणि 2027-28 या तीन वर्षांकरता या शवदाहिनी खरेदी करण्यात येणार असून प्रतिवर्ष एक याप्रमाणे तीन कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

याशिवाय; स्मशानभूमींत अंत्यसंस्कारांसाठी लाकडांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. लाकडांचा होणारा वापर पर्यावरणाच्या दृष्टीने हानीचा आहे. त्यात शहराची प्रदूषण पातळीही वाढत आहे. त्यामुळे शहरात इको-फ्रेंडली अंत्यसंस्कार यंत्रणा बसविणे गरजेचे आहे, असे कारण पुढे करत या यंत्रणेसाठी तब्बल 6 कोटी 40 लाख 02 हजार 020 रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

विशेष म्हणजे; कोट्यवधी रुपयांच्या या खर्चानंतरही वसई-विरार शहरातील स्मशानभूमींची आत्यंतिक दयनीय अवस्था असून नागरिकांना स्मशानभूमींत आवश्यक सुविधाही मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महापालिकेने विविध कारणे पुढे करत केलेल्या खर्चाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यानिमित्ताने होत आहे.लिड : 3

अधिकाऱ्यांनी मढ्यावरचं लोणी खाल्लं!

20 कोटींच्या खर्चानंतरही….महापालिका स्मशानभूमींत लाकडांचा तुटवडा…!

स्मशानभूमींचीही दुर्दशा : नागरिकांच्या संतापाचा कडेलोट!

प्रतिनिधी

विरार : मागील पाच वर्षांत जळाऊ लाकडे व अन्य सुविधांवर अंदाजित 20 कोटी रुपये खर्च करूनही वसई-विरार महापालिकेच्या बहुतांश स्मशानभूमींत लाकडेच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचे परिणाम म्हणून स्मशानभूमींत अंत्यसंस्कारांसाठी आणल्या जाणाऱ्या मृतदेहांची फरफट होत असून; मृतांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विरार पूर्व-फुलपाडा भागातील रहिवासी रणजीत सदा यांच्या आजोबांचे दीर्घ आजाराने रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी फुलपाडा येथील स्मशानभूमीत आणला होता. परंतु या स्मशानभूमीत लाकडेच उपलब्ध नसल्याची माहिती त्यांना देण्यात आली. सुमारे 60 लाख रुपयांचे बिल थकले असल्याने गेल्या 15 दिवसांपासून लाकडांचा पुरवठा ठेकेदाराने पूर्णपणे बंद केला असल्याचे स्मशानभूमीतील कर्मचारी संजय सुर्वे यांनी त्यांना सांगितले. त्यामुळे सदा कुटुंबीयांना मृतदेहासाठी पर्यायी स्मशानभूमी गाठावी लागली.

केवळ फुलपाडाच नाही; तर मनवेलपाडा, चंदनसार, कोपरी गावांतील स्मशानभूमींतही हीच स्थिती आहे. तिथेही लाकडे उपलब्ध नसल्याने लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच संजय केळकर त्यांच्या टेम्पोतून लाकडे नेण्यासाठी या ठिकाणी आले होते; परंतु त्यांचीही निराशा झाली होती. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार; ही अतिशय चिंताजनक स्थिती आहे. अंत्यसंस्कारांसारख्या संवेदनशील प्रक्रियेत मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना सदस्यांना वारंवार भटकंती करावी लागत आहे. स्मशानभूमींत आवश्यक मूलभूत सुविधा योग्यरीत्या पुरवली जात नसल्याने महापालिकेच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

गंभीर बाब म्हणजे; स्मशानभूमींची अवस्थाही खूपच वाईट आहे. कार्यालयांत पंखाही नाही, भिंतींमधून पावसाचे पाणी गळते आणि सर्वत्र गोंधळ उडतो. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, तीनपेक्षा जास्त वेळा पालिका अधिकाऱ्यांना पत्रे पाठवण्यात आली आहेत, परंतु अद्याप समस्या सुटलेली नाही. यामुळे अंत्यसंस्कारांसाठी दररोज येणाऱ्या नागरिकांना योग्य ती सेवाही देता येत नाही.

दरम्यान; सन 2024-25 या वर्षात महानगरपालिका हद्दीतील स्मशानभूमींत शव दहनासाठी जळाऊ लाकडांचा पुरवठा करण्याकरता वसई-विरार महापालिकेने 2 कोटी 40 लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय या माध्यमातून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी विरार-विराट नगर येथील स्मशानभूमीत दीड कोटी रुपये खर्च करून वायुउत्सर्जन चिमणी बसविण्यात आलेली आहे. मागील पाच वर्षांत पालिकेने जळाऊ लाकडांवर अंदाजे 10 कोटी रुपये खर्च केलेले आहेत.

वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीत एकूण 88 स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमींत प्रेत दहनाकरता जळाऊ लाकडे महापालिकेमार्फत मोफत पुरवण्यात येतात. मार्च 2023 पर्यंत प्रेतदहनाकरता 3109 टन 695 किलोग्रॅम जळाऊ लाकडांचा वापर झालेला आहे. एप्रिल 2022 ते मार्च 2023 अखेरपर्यंत एकूण 8801 शव दहन करण्यात आली असल्याचे पालिकेने म्हटले आहे. तर मार्च 2024 पर्यंत 4083 टन 575 किलो जळाऊ लाकडांचा पुरवठा झालेला आहे. या माध्यमातून एप्रिल 2023 ते मार्च 2024 अखेरपर्यंत एकूण 8742 शव दहन करण्यात आलेली आहेत. सन 2019 ते 2024 पर्यंत वसई-विरार महापालिकेने 8 कोटी 67 लाख 87 हजार 683 इतका खर्च केवळ जळाऊ लाकडांवर केलेला आहे.

दरम्यान; कोविड संक्रमण काळात वाढलेली मृत्यूंची संख्या; शिवाय मृतदेह जाळताना होणारे प्रदूषण रोखणे, वृक्षांचे संवर्धन व संरक्षण होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमां`तर्गत पालिकेने शहरातील स्मशानभूमींत गॅसशवदाहिनी बसवण्याचा निर्णय घेतला होता.

या कार्यक्रमांतर्गत पालिकेला प्राप्त झालेल्या 32 कोटीच्या निधीतून आचाळेसह पाचूबंदर, नवघर, समेळपाडा आणि विरार स्मशानभूमींत गॅसशवदाहिनी बसवण्यात आलेली होती. त्यासाठी प्रति गॅस शवदाहिनी 32,97,510 इतकी रक्कम निश्चित करण्यात आली होती. चार स्मशानभूमींतील गॅस शवदाहिनीकरता पालिकेने तब्बल 1 कोटी 31 लाख 90 हजार 040 रुपये खर्च केलेले आहेत.

दरम्यान; वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील विविध स्मशानभूमींत ‘कास्ट आयर्न`च्या शवदाहिनी खरेदी करण्याचा निर्णयदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेला आहे. 2025-26, 2026-27 आणि 2027-28 या तीन वर्षांकरता या शवदाहिनी खरेदी करण्यात येणार असून प्रतिवर्ष एक याप्रमाणे तीन कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

याशिवाय; स्मशानभूमींत अंत्यसंस्कारांसाठी लाकडांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. लाकडांचा होणारा वापर पर्यावरणाच्या दृष्टीने हानीचा आहे. त्यात शहराची प्रदूषण पातळीही वाढत आहे. त्यामुळे शहरात इको-फ्रेंडली अंत्यसंस्कार यंत्रणा बसविणे गरजेचे आहे, असे कारण पुढे करत या यंत्रणेसाठी तब्बल 6 कोटी 40 लाख 02 हजार 020 रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

विशेष म्हणजे; कोट्यवधी रुपयांच्या या खर्चानंतरही वसई-विरार शहरातील स्मशानभूमींची आत्यंतिक दयनीय अवस्था असून नागरिकांना स्मशानभूमींत आवश्यक सुविधाही मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महापालिकेने विविध कारणे पुढे करत केलेल्या खर्चाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यानिमित्ताने होत आहे.
***

मागील पाच वर्षांत जळाऊ लाकडांवर झालेला खर्च!

सन खर्च
2019-20 1,95,44,127
2020-21 1,76,07,609
2021-22 1,68,66,770
2022-23 1,36,12,755
2023-24 1,91,56,422

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech