जिल्ह्यात पावसाची संतत धार,हळवी शेती झोपली निम गरवी व गरव्या शेतीला ही धोका भात शेतीचे नुकसान , नवरात्रीच्या उत्सवावर ही परिणाम

0

जिल्ह्यात पावसाची संतत धार,हळवी शेती झोपली निम गरवी व गरव्या शेतीला ही धोका भात शेतीचे नुकसान , नवरात्रीच्या उत्सवावर ही परिणाम

 विरार | प्रतिनिधी  :  पालघर जिल्ह्यात हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजांना तंतोतंत खरे ठरवत पावसाने शनिवारी रात्री नऊ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार बरसात करायला सुरुवात केली.ती पूर्ण रात्रभर संतत धार धरून रविवारी हे वृत्त लिहेपर्यंत सुरूच होती. जिल्ह्यातील नद्या,नाले आणि ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले.यामुळे पूर्ण जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले.

तर सर्वात मोठा फटका हा जिल्ह्यातील भातशेती शेतकऱ्यांना झाला असून आताच कणसे बाहेर सोडून परिपक्वतेला आलेल्या हळव्या पिकांना या पावसाने अक्षरशः लोळवून झोपवले आहे.यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून हाता तोंडाशी आलेला घास पाण्यातील चिखलात माखला आहे.याचबरोबर निम गरव्या शेतीच्या खाचरात नुकतीच हिरव्या बहारदार कणसांनी बहरलेली शेती ही अनेक ठिकाणी आडवी झाली आहे.तर अधिक दिवसांचे पीक असलेल्या गरव्या शेतीला धोका संभवतो आहे.

 

यामध्ये यंदा सतत पाऊस आणि ढगाळ वातावरण राहिल्याने भात शेतीवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे.यामुळे यंदा भात उत्पादनावर मोठा परिणाम होण्याचा कयास शेतकरी व्यक्त करत आहेत.अगदी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर और केलेल्या खरीप भात शेतीच्या लागवडीत सुरू झालेली राबणी , बांध बंदोस्ती,शेती सपाटीकरण, भात पेरणीची सुकी उखळणी, पेरणी,खणंणी,चिखळणी , आवणी, बेणनी,यांसह औषधे, खते,ट्रॅक्टर भाडे,मजुरी व स्वतः शेतकऱ्यांनी भातशेती लागवडीसाठी केलेला चार महिन्यांचा आटापिटा या पावसात वाहून जात असल्याचे पाहून भात उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात भर पावसात पाणी वाहू लागले आहे.

यंदा खर्च तरी भरून निघेलना असा सवाल तो आभाळाकडे पाहून देवाला विचारत आहे. यासाठी कृषी विभागाने शेतीची पाहणी करून योग्य ते उपाय सुचवण्याची मागणी तसेच शेतकऱ्यांना या संकटातून शासनाने सर्वतोपरी दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान धरलेल्या संतत धारेतील जरी रविवार हा सुट्टीचा वार असला तरी ज्यांचे पोट रोजंदारीवर आहे असे नागरिक, कारखान्यात किंवा खाजगी ठिकाणी कामाला जाणारे कामगार,तसेच अत्यावश्यक सेवा असलेले सेवक, शेतीमाल बाजारात नेणारे शेतकरी,रानभाज्या विक्रेते यांना संतत धार धरलेल्या पावसामुळे आपल्या इच्छित स्थळी पोहचता आले नाही.त्यामुळे त्यांचेही दैनंदिन कमाईचे नुकसान झाले.

हळवी शेती गेल्यात जमा आहे.तर निम गरवीशेती जी कणसे टाकत आहे ती व गरवी शेती जी पोटरी धरलेली भात शेती आहे तिच्या गाभात पाणी गेल्याने पुढे येणारी कणसे ही दाणे नसलेली म्हणजेच पलिंद पीक येणारी असल्याची दाट शक्यता आहे. यामुळे यंदा भात शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्याला योग्य मदत देऊन शासनाने उभारी द्यावी.
—लक्ष्मीप्रसाद पाटील—शेतकरी— आडणे —-वसई पूर्व .

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech