दिव्यात शिवसेना उपशहरप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न.आमदार राजेश मोरे यांनी देखील केले रक्तदान.
संतोष पडवळ – ठाणे ता १७ ऑगस्ट : शिवसेना दिवा उपशहर प्रमुख व मा. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार १७ ऑगस्ट रोजी दिवा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिवा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवक कैलेश पाटील यांच्या आयोजनाने दरवर्षी शैलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. येत्या २० ऑगस्ट रोजी कार्यसम्राट नगरसेवक शैलेश पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
रक्तदान हेच श्रेष्ठदान असून या सामाजिक भावनेतून शैलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन समाजसेवक कैलास मनोहर पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिर दिव्यातील रिलायन्स टॉवर, शिवसेना शाखा दिवा येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांची विशेष उपस्थिती लाभली प्रसंगी आयोजित शिबिरामध्ये आमदार मोरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतः ही रक्तदान केले व रक्तदान हेच सर्व श्रेष्ठदान असून दिवा शहरातील नागरिकांनी रक्तदान करण्याचे देखील आवाहन केले.
सदर शिबिरासाठी ब्लड लाईन आणि चॅरिटेबल ब्लड बँक, ठाणे यांचे विशेष सहकार्य लाभले तर हरदेव हॉस्पिटलचे संचालक शेखर देशमुख हे देखील उपस्थित होते. सदर शिबिरात १५७ जणांनी रक्तदान केले तर सर्व रक्तदात्यांचा मा. नगरसेवक शैलेश पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवारांनी सत्कार व अभिनंदन केले. प्रसंगी मा. उपमहापौर रमाकांत मढवी, आदेश भगत यांच्यासह दिवा शिवसेनेचे विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, विभाग अध्यक्ष – उपाध्यक्ष उपस्थित होते. तसेच स्थानिक शाखेचे प्रदीप पाटील, भरत मोहिते, किरण जाधव, सुरेश जगताप, जगदीश कदम, माऊली मोहिते, संतोष तांबे यांसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.