वसई तालुक्यातील जुन्या व जीर्ण इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी मार्गदर्शन शिबिर

0

 

प्रतिनिधी | विरार : भारतीय जनता पार्टी स्वयंपुनर्विकास कृती समिती, वसई वतीने वसई येथे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी एक भव्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर रविवार, २० जुलै २०२५ रोजी, दुपारी ०४.०० वाजता अपुलँड ग्रँड बॅन्क्वेट हॉल, कौल हेरिटेज सिटी, वसई (प.) येथे होणार आहे.

स्वयंपुनर्विकासाचे प्रमुख शिल्पकार तथा मार्गदर्शक मा.आ. श्री. प्रविण दरेकर ( गटनेते महाराष्ट्र विधान परिषद, भाजपा आणि अध्यक्ष – मुंबई बँक) यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

“हो हे खरंच शक्य आहे… तुमच्या घराच्या जागेवर तीनपट मोठं घर मिळू शकतं!” या आश्वासक संकल्पनेवर आधारित या शिबिरात, सहकारी गृहनिर्माण संस्थांनी स्वतःच त्यांच्या इमारतीचा स्वयंपुनर्विकास करण्यासाठी नेमके काय करावे, त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, कायदेशीर प्रक्रिया काय आहे , आर्थिक मदत कशी उपलब्ध करता येईल , याबद्दल सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.

या शिबिरासाठी पालघर लोकसभा खासदार श्री.हेमंत सवरा, नालासोपारा विधानसभा आमदार श्री.राजन नाईक, वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री.मनोज सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी, महसूल श्री.शेखर घाडगे, तहसीलदार वसई श्री.अविनाश कोष्टी, सहकारी संस्था पालघर जिल्हा उपनिबंधक श्री.शिरीष कुलकर्णी, सहकारी संस्था वसई उपनिबंधक श्री.अमर शिंदे, दि.ठाणे जि.हौ. फेडरेशन लि.अध्यक्ष श्री.सिताराम राणे, दि.ठाणे जि.मध्यवर्ती बँक कार्यकारी अधिकारी श्री.श्रीकांत पठारे, भाजपा वसई विरार शहर जिल्हा अध्यक्षा श्रीमती प्रज्ञा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सर्व नागरिकांनी आणि सहकारी संस्थांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वसई विधानसभा आमदार सौ.स्नेहा दुबे पंडित यांनी केले आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech