वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या आरोपीस अटक!

  प्रतिनिधी | विरार : फार्महाऊस येथे अवैध वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या आरोपीस अटक करून पीडित महिलेची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, नालासोपारा यांना यश आले आहे. 16 जुलै रोजी अनैतिक मानवी वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना या संदर्भात माहिती प्राप्त झाली होती. सुनील मनोज परेड (33) हा व्यक्ती मोबाईलवरून गिऱ्हाईकांशी संपर्क […]

Continue Reading

गणेशोत्सव बुकिंगकरता चाकरमान्यांची झुंबड! विरार-मनवेलपाड्यात दूरवर रांगा

    प्रतिनिधी | विरार : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे आरक्षणाची अनुपलब्धता आणि खासगी ट्रव्हल्सकडून ऐन वेळी तिकीट दरांत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेत कोकणवासीयांनी आतापासूनच खासगी गाड्यांची बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. याचे परिणाम म्हणून मागील आठवड्यांपासून विरार-मनवेलपाड्यातील खासगी ट्रॅव्हल्स कार्यालयांसमोर दूरवर रांगा लागलेल्या निदर्शनास येत आहेत. यातील बहुतांश चाकरमानी तिकिटासाठी रात्रीपासूनच रांगेत उभे […]

Continue Reading

‘माझं संविधान, माझा स्वाभिमान’ – संविधान स्विकारलेल्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा गौरव व स्पर्धेचे उद्घाटन.

ठाणे | प्रतिनिधी :- भारताच्या संविधान स्वीकारल्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक औचित्याने ‘AGNI’ (Active Governance National Initiative) तर्फे ‘माझं संविधान, माझा स्वाभिमान’ या शीर्षकाखाली एक विशेष जनजागृती अभियानाची सुरुवात आज राज्यभर करण्यात आली.या  अभियानाचा उद्देश तरुणाईसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संविधानातील मूल्यांची जाणीव, अभिमान आणि सक्रिय नागरिकत्वाची भावना निर्माण करणे हा आहे. ठाणे येथील टाउन हॉल, […]

Continue Reading

केंद्राचा ‘राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम` चितेवर!

पर्यावरण रक्षणाऐवजी महापालिकेकडून 2 कोटी 40 लाखांची जळाऊ लाकूड खरेदी गॅस शवदाहिनीवरील दीड कोटीचा खर्च हवेत प्रदूषण टाळण्यासाठी विराट नगर येथील स्मशानभूमीत दीड कोटीची चिमणी प्रतिनिधी विरार : सन 2024-25 या वर्षात महानगरपालिका हद्दीतील स्मशानभूमींत शव दहनासाठी जळाऊ लाकडांचा पुरवठा करण्याकरता वसई-विरार महापालिकेने 2 कोटी 40 लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय या […]

Continue Reading

विधानसभा निवडणुकीत भाजप बविआला मदत करणार?

संजय राणे आगामी विधानसभा निवडणुकांचं बिगुल कधीही वाजेल, अशी शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर वसईत निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. याच निवडणुकांची शक्यता लक्षात घेऊन वसईतील स्थानिक बहुजन विकास आघाडी हा पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते कामाला लागले आहेत. याच कामांचा भाग म्हणून नुकतेच विरार-चिखलडोंगरी येथील महावितरणच्या विद्युत केंद्राचं भूमिपूजन वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या […]

Continue Reading