अजीव पाटील लोकसेवेचा प्रदीर्घ वारसा आणि विकासाचे नवे व्हिजन! प्रभाग : 4 मध्ये प्रचंड लोकप्रियता
विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या आगामी 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रभाग क्रमांक 4 मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागातून बहुजन विकास आघाडीचे (बविआ) संघटक-सचिव आणि माजी स्थायी समिती सभापती अजीव पाटील यांची उमेदवारी चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. गेल्या 35 वर्षांपासून लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठेने कार्यरत असलेल्या अजीव पाटील यांचा जनसंपर्क आणि सामाजिक कार्याचा आलेख विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
अजीव पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासात लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचे विचार आणि विकासकामे प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचे काम केले आहे. केवळ निवडणुकांपुरते मर्यादित न राहता, वर्षभर सामान्य जनतेच्या सुख-दुखात सहभागी होणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. बविआचे संघटक-सचिव म्हणून काम करताना त्यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी तळागाळापर्यंत मजबूत केली आहे.
संकट काळातच खऱ्या नेतृत्वाची कसोटी लागते. कोविड-19 च्या भीषण संक्रमण काळात अजीव पाटील यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता मैदानात उतरून काम केले. टाळेबंदीच्या काळात गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना रेशन वाटप, औषधांची मदत आणि आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. विशेषतः लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या अडचणीतही ते खंबीरपणे पाठीशी उभे राहिले, ज्याची चर्चा आजही परिसरात होत आहे.
राजकीय रणनीती आखण्यात माहीर असलेल्या अजीव पाटील यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानही तितकेच मोठे आहे. यंगस्टार ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी वसई-विरारमध्ये सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवली आहे. विविध कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी महिला आणि तरुणाईमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
माजी स्थायी समिती सभापती म्हणून काम करताना त्यांनी विकासाच्या कामांवर घेतलेली पकड आणि प्रशासकीय अनुभवाचा फायदा त्यांना या निवडणुकीत होताना दिसत आहे. प्रभाग 4 मधील मतदारांशी असलेला त्यांचा थेट संवाद आणि कामाचा माणूस ही प्रतिमा यामुळे त्यांना इतर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तुलनेत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
अजीव पाटील यांचा 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, कोविड काळातील सामाजिक सेवा आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्यावरील निष्ठा या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. प्रभाग क्रमांक 4 च्या सर्वांगीण विकासासाठी एक अनुभवी आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून अजीव पाटील यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. येणारी निवडणूक त्यांच्या या सकारात्मक कार्याची पोचपावती देणारी ठरेल, असेच चित्र सध्या दिसत आहे.
***