प्रभाग : 24मध्ये बविआला सक्षम पर्याय अतुल पाटील!सरकारच्या योजना आणि महापालिका क्षेत्रातील प्रलंबित विकासकामांना प्राधान्यघ रोघरी जाऊन संपर्क वाढवण्यावर भर

0

 

प्रभाग : 24मध्ये बविआला सक्षम पर्याय अतुल पाटील!सरकारच्या योजना आणि महापालिका क्षेत्रातील प्रलंबित विकासकामांना प्राधान्यघ रोघरी जाऊन संपर्क वाढवण्यावर भर

विरार  | प्रतिनिधी :  वसई-विरार महानगरपालिका निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी होत असून प्रभाग 24 मध्ये बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) प्रभावाला टक्कर देण्यासाठी महायुतीच्या वतीने शिवसेना (शिंदे गट) जिल्हा सचिव अतुल पाटील यांनी महायुतीच्या माध्यमातून विशेष रणनीती आखली आहे. या शहरी प्रभागात अतुल पाटील विविध मुद्द्यांच्या आधारे आघाडी घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात महायुती झाली आहे. प्रभाग 24 सारख्या शहरी भागात भाजपचीही चांगली मते असल्याने, शिंदे गट आणि भाजपची एकत्रित ताकद बविआसमोर मोठे आव्हान उभे करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राबविलेल्या योजना आणि महापालिका क्षेत्रातील प्रलंबित विकासकामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन देऊन अतुल पाटील मतदारांना आकर्षित करत आहेत. अनेक दशकांपासून असलेल्या बविआच्या एकहाती सत्तेला कंटाळलेल्या मतदारांना बदल म्हणून अतुल पाटील एक सक्षम पर्याय म्हणून समोर येत आहेत.

जिल्हा सचिव या नात्याने त्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला दांडगा संपर्क आणि शहरी समस्यांची (उदा. पाणी, रस्ते, वाहतूक कोंडी) असलेली जाण त्यांना प्रचारात मदत करत आहे. निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असल्याने, महायुतीच्या वतीने धनुष्यबाण चिन्हाचा प्रचार करत त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. प्रभाग : 24 मध्ये बविआचे वर्चस्व असले, तरी महायुतीची मते विभागली न जाणे आणि शहरी मतदारांचा कल बदलणे यावर अतुल पाटील यांची मदार आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech