निलेश पवार यांना मानगाव तालुका पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

0

निलेश पवार यांना मानगाव तालुका पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

मुंबई | प्रतिनिधी :  महाड मधील समाजसेवी पत्रकार निलेश पवार यांना माणगाव पत्रकार संघाने आदर्श पत्रकार पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे. लवकरच हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

महाड मधील पत्रकार निलेश पवार यांना माणगाव पत्रकार संघाचा पुरस्कार पुरस्कार जाहीर झाला आहे. माणगाव तालुका पत्रकार संघाच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार जाहीर करण्याचा निर्णय झाला. यामध्ये आदर्श पत्रकार म्हणून महाड मधील पत्रकार निलेश पवार यांना जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हा पुरस्कार दिनांक १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

पत्रकार निलेश पवार हे गेली वीस वर्षांहून अधिक पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी विविध समस्यांना वाचा फोडली आहे. गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. जनसंवाद, मैत्र जीवाचे, समाधान अशा संस्थांच्या माध्यमातून ते सामाजिक क्षेत्रात देखील अग्रेसर आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार, अशा अनेक संस्थांचे पुरस्कार त्यांना यापूर्वीच मिळालेले आहेत. विविध सामाजिक क्षेत्रात त्यांचा सन्मान झालेला आहे. माणगाव तालुका पत्रकार संघाच्या या पुरस्कारामुळे त्यांच्या गौरवशाली कामात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech