प्रतिनिधी | विरार : शिवसेना विराट नगर, विभागाच्या वतीने उपशहर प्रमुख राहुल फडतरे, दीपक चव्हाण, विभाग प्रमुख शरद सावंत यांच्या पुढाकाराने गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम जिल्हाप्रमुख प्रविण म्हाप्रळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास महिला जिल्हा समन्वयक प्राचीताई फनसे, उप तालुका प्रमुख नरेश वैद्य, शहर प्रमुख विवेक पवार, शहर उपप्रमुख लहू साळुंखे, सागर साळुंखे, शहर संघटक वंदना नादवीकर, उप शहर संघटक गीता सिंग, शहर सचिव विनायक नादवीकर, विभाग प्रमुख आनंद नाईक उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी विभाग संघटिका अनामिका जाधव, उप विभाग प्रमुख राजेश गोळे, भूपेश भायदे, शाखा प्रमुख सुमित गावडे, ललित गायकवाड, शैलेश सक्रे, रोहित शेट्ये, जय खाडये, पार्थ भायदे, अस्तित्व या सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि कार्यक्रम यशस्वी केला.