प्रभाग – 25 : अमोल म्हात्रे यांची प्रचारात घोडदौड! महायुतीचे पाठबळ आणि सर्वसमावेशक विकास हेच प्रचाराचे मुख्य सूत्र

0

 

प्रभाग – 25 : अमोल म्हात्रे यांची प्रचारात घोडदौड! महायुतीचे पाठबळ आणि सर्वसमावेशक विकास हेच प्रचाराचे मुख्य सूत्र

विरार | प्रतिनिधी : वसई-विरार महानगरपालिका निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी पार पडत आहे. प्रभाग 25 मधून शिवसेना (शिंदे गट) तर्फे अमोल म्हात्रे निवडणूक रिंगणात असून, या संमिश्र लोकवस्तीच्या प्रभागात सर्वसमावेश मुद्द्यांवर त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वसई-विरारमध्ये प्रचाराचा नारळ फोडताना खुर्चीचा नाही तर विकासाचा अजेंडा राबवण्याचे स्पष्ट केले आहे. अमोल म्हात्रे यांनी राज्य सरकारमार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना आणि निधीचा वापर करून स्थानिक मूलभूत सोयीसुविधांच्या (रस्ते, पाणी, वीज) विकासाचे आश्वासन मतदारांना देऊ दिले आहे.

प्रभाग 25 मध्ये ख्रिस्ती, हिंदू, आदिवासी आणि मुस्लिम अशा विविध समाजांचे वास्तव्य आहे. त्यामुळे त्यांनी विकासाची समावेशक रणनीती (सर्वधर्मसमभाव) आखली आहे. या प्रभागात आदिवासी मतदारांची संख्या लक्षणीय (सुमारे 5,861) आहे. त्यामुळे अमोल म्हात्रे यांनी आदिवासी पाड्यांच्या मूलभूत समस्या (आरोग्य आणि शिक्षण) यावर भर दिलेला आहे.

विशेष म्हणजे; महायुतीतील शिंदे गट सर्वसमावेशक विकासाचे धोरण मांडत असल्याने, अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रलंबित नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अमोल म्हात्रे प्रयत्नशील असल्याचे एकंदर त्यांचा प्रचार पाहता लक्षात येते. त्यांची हीच सर्वसमावेशक भूमिका त्यांच्या प्रति ख्रिस्ती आणि हिंदू मतदारांमध्ये विश्वास निर्माण करत आहे.

दरम्यान; नालासोपारा आणि वसई भागातील जनता मागील 30 वर्षांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळलेली आहे. अमोल म्हात्रे यांनी स्थानिक नगरसेवक पातळीवर होणारा अन्याय दूर करण्याचे आणि पारदर्शक कारभाराचे वचन देऊन लोकांचा कौल मिळवेला आहे.

या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि बहुजन विकास आघाडी () यांच्याकडून कडवे आव्हान असले, तरी महायुतीचे पाठबळ आणि सर्वसमावेशक विकास हे अमोल म्हात्रे यांच्या प्रचाराचे मुख्य सूत्र आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech