“सायकलवरून आला प्रकाश — बेघरांच्या चेहऱ्यावर झळकली खरी दिवाळी”
ठाणे : दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि माणुसकीचा उत्सव — आणि ठाण्यातील सायकल प्रेमी फाउंडेशन (ACPF) ने यंदा तो अर्थ अधिक सुंदरपणे उजळवला.
संस्थेने “इको-फ्रेंडली दिवाळी सायकल राईड” आयोजित करून ठाणे महानगरपालिकेच्या बेघर निवारा केंद्रातील लाभार्थ्यांसोबत फराळ, मिठाई आणि संवादाच्या माध्यमातून दिवाळी साजरी केली.

या वेळी सायकलिस्ट प्रिया कांबळे हिने सायकलवर आधारित रांगोळी साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निवारा केंद्रातील रहिवाशांनी आलेल्या सायकल प्रेमींची ओवाळणी करून स्वागत केले.भावनांनी भरलेल्या क्षणांत एक लाभार्थी म्हणाला, “मन भरून आलं… इतक्या वर्षांनी असं वाटलं की कोणीतरी आपल्यासाठी आलं आहे. ही दिवाळी आमच्यासाठी खरंच खास ठरली.” केंद्राचे व्यवस्थापक मनीष वाघमारे म्हणाले, > “या केंद्रातील अनेकजण जीवनातील संघर्षांमुळे समाजापासून दूर गेलेले आहेत.अशा कार्यक्रमांमुळे त्यांना आत्मविश्वास आणि माणुसकीचा हात मिळतो.”
या वेळी “दुर्गे दुर्घट भारी – नवरात्र सायकल चॅलेंज 2025” चा निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षक तुषार डोके यांचा सत्कार करण्यात आला, तर संस्थेतील रणरागिणी प्रिया कांबळे हिला “नवदुर्गा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष प्रज्ञा मात्रे म्हणाल्या की, “या केंद्रातील अनेक लाभार्थी जीवनातील संघर्षांमुळे समाजापासून दुरावलेले आहेत.
अशा कार्यक्रमांमुळे त्यांना आत्मविश्वास आणि माणुसकीचा हात मिळतो.”
निकाल संक्षेप:
हौशी गट (Men): ऋषिराज टिल्लू, प्रकाश जिझस, प्रदीपकुमार सोलंकर
हौशी गट (Women): शीतल देवळकर, लता रविचंदर, प्रिया कांबळे
प्रोफेशनल गट (Men): रवी यादव, प्रशांत कावळे, प्रविण सागरे
प्रोफेशनल गट (Women): वैशाली पवार, जयश्री कुदळे, डॉ. वैशाली दोंडे
सायकलिस्ट सतीश जाधव म्हणाले > “दरवाजातून आत येताना ओवाळणी झाली, तेव्हा आईची आठवण झाली.
सामाजिक समरसतेची जाणीव मनात ठेवणं — हीच खरी दिवाळी आहे.”
सुवर्णा अडसुळे, दुर्गा गोरे, नरेश मालुसकर, कुंदा शिरसाट यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाला अर्थपूर्ण बनवणारी ठरली.
पोल महाबळेश्वर मार्गावरील पूर्ववत महिनाभर बंद असल्याने आर्थिकदृष्ट्या प्रवासी वर्गात समाधान
महाड – वाह : – नैसर्गिक आपत्ती घाट मार्गी मार्गी गडगडाग़्हा स्वतंत्रपणे खुले आदेश दिले आहेत. या मार्गाने महिनाभरात एसटी व्हीजीटी व्ही सह बंद विक्री पूर्व व्यवसाय सुरू करण्यासाठी जाहीर समाधान व्यक्त केले जात आहे.
महाडचे प्रांताधिकारी यांनी कार्यान्वित अभियंता, (कोकण) महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ मुंबई पोलाद महाबळेश्वर राज्य मार्ग (अंबेनळी घाटा) सुविधा व मजबुत काम पार्केथवर स्थानिकीकरण अडगळे हटवणे, ढिगारा साफ करणे आणि सुरक्षित करणे हे त्यांच्यासाठी सुरक्षित आहे. पूर्ण करणे आवश्यक आहे.
एकाच वेळी पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. संपूर्ण करणे पूर्ववत सुरू स्थिती सूचना संबंधित विभागांना दिले महाबळ वाय पाचारा सात तालेश्वर या मार्गाने जाणारे मार्ग मार्ग आवेनळी घाटातून दूर जात एक महिना सुरक्षित कारणास्तव शांतता थांबला होता कारण घाटात सर्व काही पूर्ण झाले. आत्ताच सुरू आहे.
पोलादपूर संपूर्ण कापडे , आटा , चिरेखिंड , वाडा कुंभशी इतर गावांप्रमाणे या पायरो प्रवासी वर्गाला योग्य आहे. त्याचप्रमाणे या मार्गावरून जाण्यासाठी पोलादपूर महाबळेश्वर पुणे , महाड अक्कलकोट , रोहा , रोहा तुळजापूर , रोहाली , श्रीवर्धन मिरज , सातारा सह पाचणी मुंबई , महाबळेश्वर मुंबई आदी प्रवासी बसेस मित्र वाहने या मार्गावरून सुरू आहे. व्यवसायाला दिलासा दिला आहे.
]]>
दिव्यात शिवसेना उपशहरप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न.आमदार राजेश मोरे यांनी देखील केले रक्तदान.
संतोष पडवळ – ठाणे ता १७ ऑगस्ट : शिवसेना दिवा उपशहर प्रमुख व मा. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार १७ ऑगस्ट रोजी दिवा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिवा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवक कैलेश पाटील यांच्या आयोजनाने दरवर्षी शैलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. येत्या २० ऑगस्ट रोजी कार्यसम्राट नगरसेवक शैलेश पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
रक्तदान हेच श्रेष्ठदान असून या सामाजिक भावनेतून शैलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन समाजसेवक कैलास मनोहर पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिर दिव्यातील रिलायन्स टॉवर, शिवसेना शाखा दिवा येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांची विशेष उपस्थिती लाभली प्रसंगी आयोजित शिबिरामध्ये आमदार मोरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतः ही रक्तदान केले व रक्तदान हेच सर्व श्रेष्ठदान असून दिवा शहरातील नागरिकांनी रक्तदान करण्याचे देखील आवाहन केले.
सदर शिबिरासाठी ब्लड लाईन आणि चॅरिटेबल ब्लड बँक, ठाणे यांचे विशेष सहकार्य लाभले तर हरदेव हॉस्पिटलचे संचालक शेखर देशमुख हे देखील उपस्थित होते. सदर शिबिरात १५७ जणांनी रक्तदान केले तर सर्व रक्तदात्यांचा मा. नगरसेवक शैलेश पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवारांनी सत्कार व अभिनंदन केले. प्रसंगी मा. उपमहापौर रमाकांत मढवी, आदेश भगत यांच्यासह दिवा शिवसेनेचे विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, विभाग अध्यक्ष – उपाध्यक्ष उपस्थित होते. तसेच स्थानिक शाखेचे प्रदीप पाटील, भरत मोहिते, किरण जाधव, सुरेश जगताप, जगदीश कदम, माऊली मोहिते, संतोष तांबे यांसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
]]>
ठाणे | प्रतिनिधी :- भारताच्या संविधान स्वीकारल्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक औचित्याने ‘AGNI’ (Active Governance National Initiative) तर्फे ‘माझं संविधान, माझा स्वाभिमान’ या शीर्षकाखाली एक विशेष जनजागृती अभियानाची सुरुवात आज राज्यभर करण्यात आली.या अभियानाचा उद्देश तरुणाईसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संविधानातील मूल्यांची जाणीव, अभिमान आणि सक्रिय नागरिकत्वाची भावना निर्माण करणे हा आहे.
ठाणे येथील टाउन हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, कोर्टनाका (पश्चिम) येथे या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘AGNI’चे संचालक श्री. निखिल पोहेकर यांनी केले. त्यांनी या अभियानामागील उद्दिष्टे स्पष्ट करत संविधानाचा सर्वांगीण अभ्यास का गरजेचा आहे, हे अधोरेखित केले.
स्पर्धेविषयी माहिती देताना सांगितले की agniindia.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्या ठिकाणी संविधान विषयक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सुंदर, सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे. ते ऐकायचं आहे व त्यावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवायची आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे, स्मृतिचिन्हे मिळणार आहेत.
या उपक्रमाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दैनिक महाराष्ट्र सम्राटचे संपादक श्री. गणेश भोईटे, दैनिक सम्राट चे कार्यकारी संपादक श्री. कुणाल कांबळे, तसेच इतर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ. मधुरा वेलणकर-साटम. त्यांनी संविधान आज वाचणे का गरजेचे आहे, यावर मार्मिक भाष्य करत सांगितले की, “नागरिक म्हणून आपल्याला संपन्न आणि सजग बनवण्यासाठी संविधानाचे नीट वाचन आणि समज आवश्यक आहे.”
या अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी www.agniindia.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

