Uname:Linux ip-208-109-10-167.ip.secureserver.net 3.10.0-1160.144.1.el7.tuxcare.els8.x86_64 #1 SMP Sun Jul 5 17:25:39 UTC 2026 x86_64

बातम्या – Aaple Kokan https://www.aaplekokan.com About kokan, For kokan and for people who love and adore kokan... Sat, 25 Jul 2026 15:27:56 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=7.0.4 प्रह्लाद जोशींकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार https://www.aaplekokan.com/2026/07/25/pralhad-joshi-holds-additional-charge-of-the-ministry-of-education/ https://www.aaplekokan.com/2026/07/25/pralhad-joshi-holds-additional-charge-of-the-ministry-of-education/#respond Sat, 25 Jul 2026 15:27:56 +0000 https://www.aaplekokan.com/?p=560 धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर

नवी दिल्ली : नीट-यूजी परीक्षेतील कथित गैरप्रकारांनंतर मोठ्या प्रमाणात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला असून, आता केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारण्यात आला आहे. त्यानंतर उपभोक्ता व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे प्रह्लाद जोशी यांना शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. नीट-यूजी परीक्षेतील कथित पेपर लीक आणि अनियमिततेच्या आरोपांनंतर देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत आंदोलन सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणाची सुरुवात नीट-यूजी परीक्षेनंतर पेपर लीक आणि गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे झाली. 

]]>
https://www.aaplekokan.com/2026/07/25/pralhad-joshi-holds-additional-charge-of-the-ministry-of-education/feed/ 0
करोडो रुपये खर्च तरीही खर्डी नेवाळी रस्ता धोकादायकच तीव्र उतार आणि उभा चढ त्यातच अरुंद वळण – वाहनचालकांना भरते धडकी https://www.aaplekokan.com/2026/03/31/despite-spending-crores-of-rupees-the-khardi-newali-road-is-dangerous-with-steep-inclines-and-steep-climbs-and-narrow-turns-drivers-are-scared/ https://www.aaplekokan.com/2026/03/31/despite-spending-crores-of-rupees-the-khardi-newali-road-is-dangerous-with-steep-inclines-and-steep-climbs-and-narrow-turns-drivers-are-scared/#respond Tue, 31 Mar 2026 07:24:56 +0000 https://www.aaplekokan.com/?p=401 करोडो रुपये खर्च तरीही खर्डी नेवाळी रस्ता धोकादायकच तीव्र उतार आणि उभा चढ त्यातच अरुंद वळण – वाहनचालकांना भरते धडकी

महाड – प्रतिनिधी : किल्ले रायगडाच्या परिसराचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असतानाच सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खर्डी नगर भवन नेवाळी वाडी ते किल्ले रायगड असा मार्ग सन २०२४ मध्ये काढण्यात आला मात्र हा मार्ग वर्षभरातच बंद ठेवण्याची पाळी रायगड प्राधिकरणाच्या प्रशासनावर आली होती. त्यानंतर सलग दोन वर्ष सातत्याने बदल करण्याच्या नादात लाखो रुपये खर्च झाले मात्र आजही हा रस्ता धोकादायकच स्थितीतच आहे.

किल्ले रायगडाचा विकास झपाट्याने होत असल्याने या ठिकाणी अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून पर्यटक, शिवप्रेमी मोठ्या संख्येने गडावर येवू लागले आहेत. किल्ल्याकडे जाण्यासाठी असलेल्या महाड रायगड या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत होती. हि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या रस्त्याचे देखील रुंदीकरण झाले असून आणखी एक पर्याय म्हणून रायगड रोप वे पासून नेवाळी – खर्डी – असा मार्ग तयार करण्यात आला आहे. २०२४ मध्ये हा रस्ता अस्तित्वात आला आणि अल्पावधीतच हा रस्ता बंद ठेवण्याची वेळ प्राधिकरणावर आली. तीव्र उतार आणि चढ चढताच दिलेली अवघड वळणे यामुळे हा मार्ग धोकादायक असल्याच्या आणि शिवप्रेमी तसेच पर्यटकांच्या जीवाशी खेळ खेळणारा असल्याने झालेल्या तक्रारीनंतर बंद ठेवावा लागला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या पर्यायाकडे शिक्षित अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याने हि परिस्थती ओढवली आहे. त्यानंतर सातत्याने दोन वेळा या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. एक वेळा हा मार्ग वाहून देखील गेला. सलग तीन वर्ष लाखो रुपये खर्चून देखील आजही परिस्थिती जैसे थेच आहे.

या मार्गावरील नगर भवन पासून नेवाळीपर्यंत असलेल्या डोंगरावर सरळ चढ आणि अरुंद वळणे देण्यात आले आहेत. यामुळे या मार्गावर मोठ्या बसेस जाणे शक्यच नाही. त्या ठिकाणी छोट्या कार, मालवाहतुकीची वाहने देखील नेताना चालकाची दमछाक झाली. ही अवस्था पाहून स्थानिक नागरिकांनी देखील या मार्गावरून वाहनांची वाहतूक करणे आजही टाळले. याबाबत रस्त्याची पाहणी करून सुधारणा करण्याची मागणी देखील करण्यात आली. मात्र रायगड प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या हितासाठी स्थानिक ग्रामस्थांचे व नागरिकांचे म्हणणे न ऐकता हा रस्ता केल्याने एक वर्षभरात चार रस्ता वाहून गेला असून शासनाचे करोडो रुपये मात्र ठेकेदाराच्या खिशात गेले असून अधिकारी मात्र याबाबत गप्प असल्याचे पाहण्यास मिळाले. नेवाळी गावाच्या खालील बाजूला असलेल्या घाट मार्गावर तीव्र वळण आणि उतार ठेवण्यात आला आहे. याठिकाणीं आता दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. रस्ता रुंद करण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र आजही तीव्र उतार आणि अवघड वळणे यामुळे स्थानिक नागरिक देखील प्रवास टाळतात.

नेवाळी गावापासून पुढे हा रस्ता जोडण्यासाठी आम्ही पर्याय दिला होता मात्र येथील अधिकाऱ्यांनी ऐकले नाही त्यामुळे हि अवस्था निर्माण झाली आहे. – यशवंत आखाडे, स्थानिक नागरिक

खर्डी नेवाळी रस्ता करताना येथील भौगोलिक स्थितीचा विचार केला नाही. ठेकेदारांच्या फायद्यासाठी प्राधिकरण काम करत आहे. या रस्त्यावर अपघात झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी – सुभाष मोरे, सामाजिक कार्यकर्ते

]]>
https://www.aaplekokan.com/2026/03/31/despite-spending-crores-of-rupees-the-khardi-newali-road-is-dangerous-with-steep-inclines-and-steep-climbs-and-narrow-turns-drivers-are-scared/feed/ 0
महाड शहराला देखील पाणी टंचाईची झळ कोथुर्डे धरणात २० टक्के तर कुर्ला धरणात ३० टक्के पाणीसाठा शिल्लक https://www.aaplekokan.com/2026/03/31/mahad-city-is-also-suffering-from-water-shortage-20-percent-of-kothurde-dam-and-30-percent-of-water-in-kurla-dam/ https://www.aaplekokan.com/2026/03/31/mahad-city-is-also-suffering-from-water-shortage-20-percent-of-kothurde-dam-and-30-percent-of-water-in-kurla-dam/#respond Tue, 31 Mar 2026 07:11:43 +0000 https://www.aaplekokan.com/?p=390 महाड – प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यात एकीकडे करोडो रुपये खर्चून जलजीवन योजना राबवल्या मात्र तरी देखील पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची झळ जाणवू लागल्याने शहरातील तीन भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती महाड नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

महाड तालुक्यात दरवर्षी ३,००० मिलिमीटर पेक्षाही अधिक पाऊस पडतो. पाणीसाठा करण्यासाठी अनेक योजना देखील राबवल्या आहेत. तरीही शहर आणि तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या कायम आहे. महाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणात अवघा २० टक्के साठा तर कुर्ला धरणात ३० टक्के साठा शिल्लक आहे. शहराला औद्योगिक क्षेत्राकडून कडून रानबाजीरे धरणातून देख्हील पाणीपुरवठा केला जातो. या औद्योगिक महामंडळाकडून महाड शहराला होत असलेला पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. यामुळे महाड शहरात पाणी टंचाईची झळ लागू लागली आहे. यामुळे महाड शहरातील पंचशील नगर, विसावा ते चांभार खिंड, प्रभात कॉलनी ते सावित्री मार्ग या भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात जात असल्याची माहिती महाड नगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी रोहित भोईर यांनी दिली

महाड शहराला दररोज ६५ लाख लिटर पाणीपुरवठा करावा लागतो. या परिस्थितीत चालू वर्षी पाणीपुरवठा करणाऱ्या कोतुर्डे जलाशयामध्ये केवळ २० टक्के साठा शिल्लक आहे तर महाड शहराजवळील कुरले धरणामध्ये केवळ ३० टक्के साठा शिल्लक असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महाड नगर परिषदेमार्फत करण्यात येत आहे तर महाड शहरातला पाणीपुरवठा करणाऱ्या औद्योगिक वसाहतीकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाई जाणवत असल्याचे नगर परिषदेकडून बोलले जात आहे. महाड शहरात सध्या अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे या भागात सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जातआहे.

महाड शहराजवळ नव्याने निर्माण होत असलेल्या कोथेरी धरणाचे घळ भरणीचे काम यावर्षी झाले तर पुढील वर्षीपासून या जलाशयांमधून महाड शहराला पाणीपुरवठा होऊ शकतो त्यामुळे महाड शहरातील पाणीटंचाईची समस्या काही प्रमाणात फुटण्यास मदत होण्याची शक्यता नाकारता येत नाही एकंदरी त महाड शहराला सध्या कोथुर्डे व कुर्ला या दोन धरणावर पाण्यासाठी नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे एमआयडीसी कडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी पाणीपुरवठा नागरिकांना पुरेशा प्रमाणात होत नसल्याने टँकर मार्फत पाणीपुरवठा करण्याची वेळ पुन्हा एकदा महाड नगर परिषदेवर आली आहे

]]>
https://www.aaplekokan.com/2026/03/31/mahad-city-is-also-suffering-from-water-shortage-20-percent-of-kothurde-dam-and-30-percent-of-water-in-kurla-dam/feed/ 0
“ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे उन्हाळी शिबिर – ३५व्या वर्षातही उत्कृष्टतेचा सातत्यपूर्ण प्रवास https://www.aaplekokan.com/2026/03/20/thane-badminton-academy-summer-camp-continued-journey-to-excellence-in-35th-year/ https://www.aaplekokan.com/2026/03/20/thane-badminton-academy-summer-camp-continued-journey-to-excellence-in-35th-year/#respond Fri, 20 Mar 2026 09:05:02 +0000 https://www.aaplekokan.com/?p=381 “ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे उन्हाळी शिबिर – ३५व्या वर्षातही उत्कृष्टतेचा सातत्यपूर्ण प्रवास

ठाणे, दि.— ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडांगणातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे, ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत यंदा ३५वे उन्हाळी बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने दर्जेदार प्रशिक्षण देत या अकॅडमीने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू घडवले आहेत. १५० हून अधिक राज्य विजेते, ३५ पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि १५ शिवछत्रपती पुरस्कार विजेते ही या प्रवासाची ठळक उदाहरणे आहेत.

या शिबिरामध्ये अनुभवी प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले माजी खेळाडू आणि तज्ज्ञ कोचेस यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सराव करताना तांत्रिक बाबींबरोबरच फिटनेस, कोर्टवरील हालचाली, खेळाची समज आणि स्पर्धात्मक मानसिकता यांवरही लक्ष दिले जाणार आहे. शिस्तबद्ध प्रशिक्षण पद्धती आणि उत्तम सुविधा यामुळे खेळाडूंना दर्जेदार वातावरणात सराव करण्याची संधी मिळते.

यंदा शिबिराची रचना तीन भागांत करण्यात आली आहे. १९ एप्रिल ते ९ मे २०२६ या कालावधीत बेसिक कॅम्प १, ११ मे ते ३० मे २०२६ दरम्यान बेसिक कॅम्प २, तसेच १९ एप्रिल ते ३० मे २०२६ या काळात ४० दिवसांचा अॅडव्हान्स बॅच आयोजित करण्यात आला आहे. सोमवार ते शनिवार दररोज चार तासांचे प्रशिक्षण सत्र होणार असून नवशिक्यांपासून प्रगत स्तरावरील खेळाडूंपर्यंत सर्वांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने सराव आखण्यात आला आहे.

अॅडव्हान्स बॅच हे या शिबिराचे खास वैशिष्ट्य मानले जाते. या बॅचमधून अनेक खेळाडूंनी पुढे जाऊन राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. सातत्यपूर्ण सराव, वैयक्तिक मार्गदर्शन आणि स्पर्धात्मक वातावरण यामुळे या बॅचमधील प्रशिक्षण खेळाडूंसाठी खूप उपयुक्त ठरते.

उन्हाळी सुट्टीचा उपयोग करून दर्जेदार प्रशिक्षण घ्यायचे असल्यास हे शिबिर चांगली संधी आहे. इच्छुकांनी सकाळी ९ ते १२ वा. आणि संध्याकाळी ६ ते ९ वा. या वेळेत प्रत्यक्ष बॅडमिंटन हॉलमध्ये संपर्क साधावा किंवा खालील क्रमांकांवर संपर्क करावा: 9004181388 / 9004039106 / 9867182548 / 9619711171 / 8369731221

]]>
https://www.aaplekokan.com/2026/03/20/thane-badminton-academy-summer-camp-continued-journey-to-excellence-in-35th-year/feed/ 0
महसूल अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत वसईच्या वेटलँडचा विनाश! नियम धाब्यावर बसवून आचोळेत खांजण जमिनीची विक्री सक्षम प्राधिकरणाची परवानगी कुठे आहे? उच्च न्यायालयाच्या आदेशालाही हरताळ! https://www.aaplekokan.com/2026/03/20/destruction-of-vasais-wetland-under-the-eyes-of-revenue-officials-where-is-the-permission-of-the-competent-authority-to-sell-mining-land-in-achole-by-putting-rules-on-dhaba-even-the-order-of-the-h/ https://www.aaplekokan.com/2026/03/20/destruction-of-vasais-wetland-under-the-eyes-of-revenue-officials-where-is-the-permission-of-the-competent-authority-to-sell-mining-land-in-achole-by-putting-rules-on-dhaba-even-the-order-of-the-h/#respond Fri, 20 Mar 2026 08:59:17 +0000 https://www.aaplekokan.com/?p=379 महसूल अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत वसईच्या वेटलँडचा विनाश! नियम धाब्यावर बसवून आचोळेत खांजण जमिनीची विक्री सक्षम प्राधिकरणाची परवानगी कुठे आहे? उच्च न्यायालयाच्या आदेशालाही हरताळ!

प्रतिनिधी । विरार : वसई तालुक्यातील आचोळे येथील मौजे आचोळे परिसरातील सर्व्हे क्र. 46/अ, 46/क या बिनआकारी (13.96.00 व 0.12.00) या खांजण आणि सीआरझेड बाधित जमिनीवर भूमाफियांनी बेकायदेशीररित्या डल्ला मारला असून, प्रशासकीय आशीर्वादाने निसर्गाचा गळा घोटला जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण परिसरात 7 ते 8 फूट उंचीचा बेकायदेशीर मातीभराव करून नैसर्गिक नाले बुजवण्यात आले असतानाही, पेल्हार तलाठी कार्यालयाने या विस्तीर्ण जागेवर केवळ 3079 ब्रास डेब्रिज भराव झाल्याचा अत्यंत त्रोटक आणि दिशाभूल करणारा अहवाल दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या गंभीर प्रकरणाकडे समाजसेवक तथा पर्यावरणप्रेमी एलयास डिसिल्वा यांनी पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे लक्ष वेधले असून, माहिती अधिकारात मिळालेल्या धक्कादायक उत्तरांमुळे महसूल विभागाचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आचोळे येथील ही जमीन 1931-32 च्या फेरफार नोंदीनुसार बिनआकारी खांजण आणि शर्थीची जमीन म्हणून नोंदवलेली आहे. वेटलँड ॲटलासनुसार हे क्षेत्र पूर्णतः पाणथळ असून पालघर जिल्ह्याच्या 23 ऑगस्ट 2023 च्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र सीआरझेड-1 बी, आयटीझेड आणि बफर झोनने बाधित आहे. असे असतानाही, या जागेवर सध्या रेडिमिक्स प्लांट उभारणीचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नाही आणि त्यासंदर्भातील एकही कागदपत्रे मंडळ कार्यालयात उपलब्ध नसल्याचा खुलासा स्वतः मंडळ अधिकाऱ्यांनी केला आहे. या बेकायदेशीर भरावासाठी संबंधित दोषींवर नेमका किती दंड आकारण्यात आला, याची माहिती देण्यासही प्रशासनाने टाळाटाळ केली आहे, ज्यामुळे बड्या बांधकाम व्यावसायिकांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय बळावला आहे.

एलयास डिसिल्वा यांनी या व्यवहारातील कायदेशीर त्रुटींवर बोट ठेवताना सांगितले की, सदर जमीन शर्थीची असतानाही सक्षम महसूल प्राधिकरणाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता दस्त क्र. 21527/2024, 21530/2024 आणि 21535/2024 द्वारे या जमिनीची नियमबाह्य विक्री करण्यात आली आहे. या व्यवहारापोटी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा नजराणा बुडाला असून, तलाठी कार्यालयाकडे या विक्रीसंदर्भातील कोणतीही चलन प्रत किंवा शर्थ शिथिलतेचे आदेश उपलब्ध नाहीत. मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका 87/2006 अंतर्गत 18 सप्टेंबर 2018 रोजी दिलेल्या आदेशानुसार, वेटलँड आणि सीआरझेड क्षेत्राचे संरक्षण करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांची आहे. मात्र, वसईत या आदेशांचे उघडपणे उल्लंघन होत असून स्थानिक महसूल अधिकारी डोळे झाकून भूमाफियांना रान मोकळे करून देत असल्याचा आरोप डिसिल्वा यांनी केला आहे.

या खांजण क्षेत्रात दरवर्षी फ्लेमिंगो, सारस आणि स्पूनबिल यांसारखे दुर्मिळ स्थलांतरित पक्षी वास्तव्यास येतात. मात्र, मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या मातीभरावामुळे हा नैसर्गिक अधिवास कायमचा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पर्यावरणाची ही हानी भरून न येणारी असून भविष्यात वसईचा पश्चिम पट्टा पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन नालासोपारा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजन नाईक, वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे-पंडित आणि पालकमंत्री गणेश नाईक यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा आणि संबंधित बांधकाम व्यावसायिक कंपनीसह दोषी महसूल अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. महसूल दप्तरातील जुन्या नोंदी पुसून जमिनीचे स्वरूप बदलण्याचा जो डाव खेळला जात आहे, तो रोखण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
***

]]>
https://www.aaplekokan.com/2026/03/20/destruction-of-vasais-wetland-under-the-eyes-of-revenue-officials-where-is-the-permission-of-the-competent-authority-to-sell-mining-land-in-achole-by-putting-rules-on-dhaba-even-the-order-of-the-h/feed/ 0
कॅबमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या 50 वर्षीय नराधमास बेड्या नायगाव पोलिसांची मोठी कामगिरी https://www.aaplekokan.com/2026/03/20/50-year-old-murderer-bedya-naigaon-police-who-molested-a-minor-girl-in-a-cab/ https://www.aaplekokan.com/2026/03/20/50-year-old-murderer-bedya-naigaon-police-who-molested-a-minor-girl-in-a-cab/#respond Fri, 20 Mar 2026 08:50:30 +0000 https://www.aaplekokan.com/?p=377  

वसई / प्रतिनिधी : नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या अनोळखी आरोपीचा शोध लावून त्याला अटक करण्यात यश मिळवले आहे. चिंचोटी ते नायगाव रेल्वे स्थानक प्रवासादरम्यान घडलेल्या या धक्कादायक घटनेतील आरोपीला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 12 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी मुलगी तिच्या आईने बुक केलेल्या कॅबमधून चिंचोटी नाका ते नायगाव रेल्वे स्टेशनकडे जात होती. प्रवासादरम्यान कॅबमध्ये बसलेल्या एका अंदाजे 55 वर्षीय इसमाने बोलण्याच्या बहाण्याने फिर्यादीशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. त्याने वारंवार मुलीच्या डाव्या मांडीला स्पर्श करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून नायगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 74, 75, 78, 79 आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम कलम 8 व 12 अन्वये गुन्हा (रजि. नं. 282/2026) दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेची दोन वेगवेगळी पथके तयार केली. या पथकाने नायगाव रेल्वे स्टेशन परिसर तसेच नायगाव ते विलेपार्ले रेल्वे स्टेशनदरम्यानचे सुमारे 100 ते 120 सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीमध्ये मिळालेल्या फोटोच्या आधारे आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी रामरक्षा मिठाईलाल मौर्या (वय 50 वर्षे, रा. आशानगर, चिंचोटी, नायगाव पूर्व) याला ताब्यात घेतले. हा इसम व्यवसायाने चालक असून मूळचा उत्तर प्रदेशातील जोनपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.

पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला रीतसर अटक करण्यात आली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ 2) पौर्णिमा चौगुले, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय कदम, सपोनि गणेश केकान, पोउपनि ज्ञानेश्वर आसबे आणि इतर पोलीस अंमलदारांचा समावेश होता.
***

]]>
https://www.aaplekokan.com/2026/03/20/50-year-old-murderer-bedya-naigaon-police-who-molested-a-minor-girl-in-a-cab/feed/ 0
सिंधुदुर्ग -देवगडच्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ! नियमबाह्य कर्जवाटपाचा संशय बळावला! महाळुंगे-नाद-ओंबळ-शेवरे विकास सोसायटीचा माहिती देण्यास नकार https://www.aaplekokan.com/2026/01/20/sindhudurg-a-major-stir-in-the-cooperative-sector-of-devgad-suspicion-of-irregular-loan-disbursement-has-intensified-the-mahalunge-nad-ombal-shevre-development-society-refuses-to-provide-informati/ https://www.aaplekokan.com/2026/01/20/sindhudurg-a-major-stir-in-the-cooperative-sector-of-devgad-suspicion-of-irregular-loan-disbursement-has-intensified-the-mahalunge-nad-ombal-shevre-development-society-refuses-to-provide-informati/#respond Tue, 20 Jan 2026 01:46:18 +0000 https://www.aaplekokan.com/?p=372 सिंधुदुर्ग -देवगडच्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ! नियमबाह्य कर्जवाटपाचा संशय बळावला! महाळुंगे-नाद-ओंबळ-शेवरे विकास सोसायटीचा माहिती देण्यास नकार

देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील महाळुंगे, नाद, ओंबळ, शेवरे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीने माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवलेली माहिती देण्यास स्पष्ट नकार दिल्याने खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे संस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नियमबाह्य सभासद नोंदणी आणि कर्जवाटपाचे गंभीर आरोप आता समोर येत आहेत.

नेमके प्रकरण काय?

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यासाठी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांची स्थापना करण्यात येते. मात्र, महाळुंगे-नाद-ओंबळ-शेवरे संस्थेत मोठ्या प्रमाणावर नियमांची पायमल्ली झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. अर्जदाराने सन २०२१ ते २०२५ या कालावधीत महाळुंगे गावातील सभासदांना वाटप करण्यात आलेल्या कर्जाचा तपशील माहिती अधिकारात मागितला होता.

या अर्जाला उत्तर देताना संस्थेचे जनमाहिती अधिकारी तथा गटसचिवांनी धक्कादायक भूमिका घेतली. “ही माहिती १६५ सभासदांच्या आर्थिक हिताची व गोपनीय आहे, त्यामुळे ती सार्वजनिक करता येणार नाही,” असे लेखी कारण देत माहिती देण्यास सपेशल नकार दिला.

*गंभीर आरोपांची मालिका*

तक्रारदाराच्या मते, संस्थेमध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि उपविधी (बायलॉज) यांचे उल्लंघन झाले आहे. यामध्ये खालील महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.

*१. नियमबाह्य सभासद नोंदणी :* संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेरील किंवा निकषात न बसणाऱ्या व्यक्तींची नोंदणी करून त्यांना सभासदत्व बहाल करण्यात आले.

*२. चुकीचे कर्जवाटप :* निकषांना बगल देऊन ठराविक व्यक्तींना कर्जवाटप करण्यात आले, ज्यामुळे प्रामाणिक आणि गरजू शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत.

*३. शेतकऱ्यांची फसवणूक* जिल्हा बँकेने ठरवून दिलेल्या स्केलनुसार कर्ज न देता, पदाधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील लोकांना लाभ मिळवून दिल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे.

*मंत्र्यांकडे तक्रार आणि चौकशीची मागणी*

माहिती नाकारल्यानंतर आता हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. अर्जदाराने जनमाहिती अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध प्रथम अपील दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकारमंत्री, ग्रामविकासमंत्री, कृषिमंत्री आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा (EOW) यांच्याकडे रीतसर तक्रार करण्यात येणार आहे.

सोसायटीच्या या संशयास्पद कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता सभासदांमधून जोर धरत आहे. माहिती दडवण्याचा प्रयत्न म्हणजे घोटाळा लपवण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात असून, यामुळे देवगडच्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
****

]]>
https://www.aaplekokan.com/2026/01/20/sindhudurg-a-major-stir-in-the-cooperative-sector-of-devgad-suspicion-of-irregular-loan-disbursement-has-intensified-the-mahalunge-nad-ombal-shevre-development-society-refuses-to-provide-informati/feed/ 0
वसई-विरारमध्ये ऑपरेशन लोटस? हितेंद्र ठाकुरांचा भाजपला इशारा, बविआचे नगरसेवक फुटणार? https://www.aaplekokan.com/2026/01/20/operation-lotus-in-vasai-virar-hitendra-thakurs-warning-to-bjp-will-the-bahujan-vikas-aghadi-mps-defect/ https://www.aaplekokan.com/2026/01/20/operation-lotus-in-vasai-virar-hitendra-thakurs-warning-to-bjp-will-the-bahujan-vikas-aghadi-mps-defect/#respond Tue, 20 Jan 2026 01:43:13 +0000 https://www.aaplekokan.com/?p=370  

वसई-विरारमध्ये ऑपरेशन लोटस? हितेंद्र ठाकुरांचा भाजपला इशारा, बविआचे नगरसेवक फुटणार?

विरार | प्रतिनिधी  : महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता वसई विरारमध्ये राजकीय संघर्षाला तोंड फुटलं आहे. इथं बहुजन विकास आघाडीने (बविआ) ७१ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले असतानाही, भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ राबवून नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. या चर्चेचा बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या खास शैलीत खरपूस समाचार घेतला असून भाजपला कडक शब्दांत इशारा दिला आहे.

वसई विरारमध्ये पार पडलेल्या ११५ जागांच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. इथं बहुजन विकास आघाडीला ७० जागा मिळाल्या असून काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. तर भाजपनं ४३ जागांवर विजय मिळवला आहे. शिंदे गटाला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.

महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला बहुमत मिळालं असलं तरी, सोशल मीडियावर भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ची एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. भाजप बविआचे नगरसेवक फोडण्याच्या तयारीत असून, काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

“राजकारणात काहीही होऊ शकते,” असे सूचक विधान भाजपच्या गोटातून केले जात असल्याने या चर्चेला उधाण आले आहे. भाजपच्या या संभाव्य हालचालींवर प्रतिक्रिया देताना हितेंद्र ठाकूर आक्रमक झाले. ते म्हणाले, “लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे. आता असले धंदे करत बसलात, तर लोक तुमच्या तोंडात शेण घालतील. ही भाजपने सोडलेली निव्वळ पुडी आहे. माझा एकही नगरसेवक कुठेही जाणार नाही आणि फुटणार नाही याची मला खात्री आहे.”

केवळ राजकीय आरोपांना उत्तर न देता ठाकूर यांनी आगामी कामांचा रोडमॅपही स्पष्ट केला. “आम्ही अनधिकृत बांधकामांवर अंकुश आणू. पिण्याचे पाणी देताना ती इमारत अधिकृत आहे की अनधिकृत हे पाहणार नाही, सर्वांना पाणी देऊ.

तसेच पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी विशेष उपाययोजना करून जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. भाजपच्या या कथित खेळीमुळे वसई-विरारच्या राजकारणात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

]]>
https://www.aaplekokan.com/2026/01/20/operation-lotus-in-vasai-virar-hitendra-thakurs-warning-to-bjp-will-the-bahujan-vikas-aghadi-mps-defect/feed/ 0
अजीव पाटील लोकसेवेचा प्रदीर्घ वारसा आणि विकासाचे नवे व्हिजन! प्रभाग : 4 मध्ये प्रचंड लोकप्रियता https://www.aaplekokan.com/2026/01/13/ajiv-patil-a-long-legacy-of-public-service-and-a-new-vision-for-development-immensely-popular-in-ward-4/ https://www.aaplekokan.com/2026/01/13/ajiv-patil-a-long-legacy-of-public-service-and-a-new-vision-for-development-immensely-popular-in-ward-4/#respond Tue, 13 Jan 2026 16:29:39 +0000 https://www.aaplekokan.com/?p=367 अजीव पाटील लोकसेवेचा प्रदीर्घ वारसा आणि विकासाचे नवे व्हिजन! प्रभाग : 4 मध्ये प्रचंड लोकप्रियता

विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या आगामी 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रभाग क्रमांक 4 मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागातून बहुजन विकास आघाडीचे (बविआ) संघटक-सचिव आणि माजी स्थायी समिती सभापती अजीव पाटील यांची उमेदवारी चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. गेल्या 35 वर्षांपासून लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठेने कार्यरत असलेल्या अजीव पाटील यांचा जनसंपर्क आणि सामाजिक कार्याचा आलेख विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

अजीव पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासात लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचे विचार आणि विकासकामे प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचे काम केले आहे. केवळ निवडणुकांपुरते मर्यादित न राहता, वर्षभर सामान्य जनतेच्या सुख-दुखात सहभागी होणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. बविआचे संघटक-सचिव म्हणून काम करताना त्यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी तळागाळापर्यंत मजबूत केली आहे.

संकट काळातच खऱ्या नेतृत्वाची कसोटी लागते. कोविड-19 च्या भीषण संक्रमण काळात अजीव पाटील यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता मैदानात उतरून काम केले. टाळेबंदीच्या काळात गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना रेशन वाटप, औषधांची मदत आणि आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. विशेषतः लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या अडचणीतही ते खंबीरपणे पाठीशी उभे राहिले, ज्याची चर्चा आजही परिसरात होत आहे.

राजकीय रणनीती आखण्यात माहीर असलेल्या अजीव पाटील यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानही तितकेच मोठे आहे. यंगस्टार ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी वसई-विरारमध्ये सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवली आहे. विविध कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी महिला आणि तरुणाईमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

माजी स्थायी समिती सभापती म्हणून काम करताना त्यांनी विकासाच्या कामांवर घेतलेली पकड आणि प्रशासकीय अनुभवाचा फायदा त्यांना या निवडणुकीत होताना दिसत आहे. प्रभाग 4 मधील मतदारांशी असलेला त्यांचा थेट संवाद आणि कामाचा माणूस ही प्रतिमा यामुळे त्यांना इतर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तुलनेत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

अजीव पाटील यांचा 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, कोविड काळातील सामाजिक सेवा आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्यावरील निष्ठा या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. प्रभाग क्रमांक 4 च्या सर्वांगीण विकासासाठी एक अनुभवी आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून अजीव पाटील यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. येणारी निवडणूक त्यांच्या या सकारात्मक कार्याची पोचपावती देणारी ठरेल, असेच चित्र सध्या दिसत आहे.
***

]]>
https://www.aaplekokan.com/2026/01/13/ajiv-patil-a-long-legacy-of-public-service-and-a-new-vision-for-development-immensely-popular-in-ward-4/feed/ 0
प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रशांत राऊत यांचा वरचष्मा! प्रदीर्घ अनुभव आणि जनसंपर्कामुळे पारडे जड https://www.aaplekokan.com/2026/01/13/prashant-raut-holds-the-upper-hand-in-ward-number-7-his-extensive-experience-and-public-relations-give-him-a-significant-advantage/ https://www.aaplekokan.com/2026/01/13/prashant-raut-holds-the-upper-hand-in-ward-number-7-his-extensive-experience-and-public-relations-give-him-a-significant-advantage/#respond Tue, 13 Jan 2026 16:26:53 +0000 https://www.aaplekokan.com/?p=365 प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रशांत राऊत यांचा वरचष्मा! प्रदीर्घ अनुभव आणि जनसंपर्कामुळे पारडे जड

विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रभाग क्रमांक 7 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागातून माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत हे निवडणूक लढवत असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे आणि जनसंपर्कामुळे त्यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या 25 वर्षांपासून प्रशांत राऊत हे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. ठाकूर यांचे विकासाचे व्हिजन केवळ कागदावर न ठेवता ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात राऊत यांचा मोठा वाटा आहे. रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधा प्रभागात सक्षमपणे राबवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

प्रशांत राऊत यांच्या लोकप्रियतेचा मुख्य आधार म्हणजे त्यांचे कोविड संक्रमण काळातील कार्य! जेव्हा सर्व जग भीतीच्या सावटाखाली होते, तेव्हा राऊत यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्यांसाठी धावून जाण्याचे काम केले. विलगीकरण कक्ष उभारणे, रुग्णांना बेड मिळवून देणे, औषधांचा पुरवठा आणि गरजू कुटुंबांना रेशन वाटप अशा व्यापक कामांमुळे त्यांनी लोकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या कार्याची प्रचिती आज निवडणुकीच्या प्रचारात मिळत असलेल्या उदंड प्रतिसादातून येत आहे.

महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती म्हणून काम करताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मंजुरी दिली. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आणि प्रभागातील प्रश्नांची अचूक जाण यामुळे त्यांना विकासपुरुष म्हणून ओळखले जात आहे.

प्रभाग 7 मधील फेरफटका मारला असता, प्रशांत राऊत यांच्याबद्दल मतदारांमध्ये प्रचंड सकारात्मकता दिसून येते. नेहमी उपलब्ध असणारा नेता अशी त्यांची प्रतिमा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा त्यांना वेगळे ठरवते. युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांशी असलेला त्यांचा थेट संवाद हीच त्यांची निवडणुकीतील सर्वात मोठी शक्ती ठरत आहे.

विकासकामे, अनुभवाची शिदोरी आणि संकटकाळात जनतेला दिलेली साथ यामुळे प्रशांत राऊत यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचा विश्वास आणि जनतेचे प्रेम यांच्या जोरावर प्रशांत राऊत पुन्हा एकदा विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सज्ज झाले आहेत.
***

]]>
https://www.aaplekokan.com/2026/01/13/prashant-raut-holds-the-upper-hand-in-ward-number-7-his-extensive-experience-and-public-relations-give-him-a-significant-advantage/feed/ 0