विरारमध्ये जुन्या इमारतीचा भाग कोसळून मलब्याखाली १५ ते २० जण अडकल्याची भीती

बातम्या

विरारमध्ये जुन्या इमारतीचा भाग कोसळून मलब्याखाली १५ ते २० जण अडकल्याची भीती

विरार | प्रतिनिधी : एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह असताना विरारमध्ये इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारतीचा काही भाग बाजूलाच असलेला चाळींवर पडला. मंगळवारी रात्री उशिरा ११.३०च्या सुमारास ही दुर्घटना घडली. पूर्वेच्या विजयनगर रमाबाई अपार्टमेंट इमारतींच्या मलब्याखाली जवळपास १५ ते २० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून अग्निशमनदल व राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांच्या मार्फत बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

आतापर्यंत ११ जणांना बाहेर काढण्यात आले आहे .
.त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे,तर न‌ऊ जण जखमी झाले आहेत.मृतांमध्ये एक वर्षाची लहान मुलगी व तिच्या आईचा समावेश आहे. तर उर्वरित नऊ जखमींना विरार मधील तीन वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *